Agriculture news in marathi Infestation of ‘Uzi’ fly in silk shed | Agrowon

रेशीम शेडमध्ये ‘उझी’ माशीचा प्रादुर्भाव 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

जालना जिल्ह्यातील काही गावांमधील रेशीम कोष उत्पादन शेडमध्ये ‘उझी’ माशीचा शिरकाव झाल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे.

जालना : जिल्ह्यातील काही गावांमधील रेशीम कोष उत्पादन शेडमध्ये ‘उझी’ माशीचा शिरकाव झाल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे.

जालना जिल्हा मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादक जिल्ह्यांपैकी प्रमुख जिल्हा आहे. जिल्ह्यात सुमारे ९७३ शेतकरी आपल्या ९८० एकरांवरील तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम कोष उत्पादन करतात. परंतु यंदा रेशीम कोष उत्पादनाची सुरुवात होत असतानाच उत्पादकांसमोर उझी माशीचे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यात एप्रिल-मे महिन्यांत उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून आला होता.

या माशीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी शेतकऱ्यांना साधारणत: दोन महिने रेशीम कोष उत्पादन बंद ठेवण्याची सूचना रेशीम विभागाकडून करण्यात आली होती. या वेळी ‘ॲग्रोवन’नेही उझी माशीच्या प्रादुर्भावाबाबत रेशीम कोष उत्पादकांना सावध केले होते. परंतू आता पुन्हा जुलैमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कोष उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

शेवली, पानेवाडी, बाणेगाव आदी गावांमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पानेवाडीतील रेशीम कोष उत्पादनाच्या दोन शेड उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे बंद केल्या. या शेडमधील रेशीम कोष उत्पादन बंद केले असले तरी त्यामधून उझी माशीचा प्रसार इतरत्र झाला. ज्यांनी नियंत्रणासाठी उपाय योजना केली त्यांच्या शेडमध्ये कमी आणि ज्यांनी उपाय योजना केल्या नाहीत, त्यांच्या शेडमध्ये ४० ते ५० टक्क्‍यांपर्यंत नुकसान झाले असल्याची माहिती रेशीम कोष उत्पादक चांगदेव मोहिते यांनी दिली. 
 

‘उझी’ नियंत्रण शक्य 
साधारणत: १९८१-८२ पासून महाराष्‍‌ट्रात उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.३६ ते ४४ दिवसांपर्यंत जीवनचक्र असलेली उझी माशी साधारणपणे ३०० अंडी घालते. वर्षभर उपाय न करता एकामागून एक रेशीम कोष उत्पादनाच्या बॅच घेतल्यामुळे उझी माशीची संख्यात्मक वाढ व प्रसार होतो. त्यामुळे एप्रिलमध्ये प्रादुर्भाव दिसताच नियंत्रणासाठी कोष उत्पादन दोन महिने थांबविण्याची सूचना केली होती. १० ते ३३ टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान करू शकणाऱ्या उझी माशीचे भौतिक, रासायनिक व जैविक पद्धतीने नियंत्रण करता येते, अशी माहिती रेशीम विभागाच्या वतीने देण्यात आली. 

प्रतिक्रिया 

उझी माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापासून नियंत्रण मिळविण्यासाठी मच्छरदाणीचा वापर, उझीनाशकाचा वापर आणि जैविक पद्धतीने नियंत्रणाचा प्रयत्न माझ्यासह सर्व शेतकरी करीत आहेत. 
- गजानन भाकड, पानेवाडी. जि. जालना 

प्रतिक्रिया 
पहिल्या बॅचचे नुकसान झाल्यानंतर दुसरी बॅच घेतली. त्यामध्ये थोडे बहुत उत्पन्न मिळाले. पण अलीकडे दीडशे अंडीपुंजाची तिसरी बॅच मोठ्या प्रमाणात उझी प्रादुर्भावग्रस्त झाल्याने पुढील बॅच न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
-आझम शेख, शेवली. ता. जि. जालना


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...