धुळ्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

कापडणे, जि. धुळे : धुळे तालुक्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांची अंतिम टप्प्यात आलेला मका वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. विविध प्रकारच्या फवारण्या सुरू आहेत. कृषी विभागही ठिकठिकाणी मार्गदर्शन करीत आहे.
Infestation of American military larvae on maize in Dhule
Infestation of American military larvae on maize in Dhule

कापडणे, जि. धुळे : धुळे तालुक्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.  शेतकऱ्यांची अंतिम टप्प्यात आलेला मका वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. विविध प्रकारच्या फवारण्या सुरू आहेत. कृषी विभागही ठिकठिकाणी मार्गदर्शन करीत आहे. 

यावर्षी खरिपाचा हंगाम नुकसानकारकच ठरत आहे. उशिराचा पाऊस, दुबार पेरण्या आणि पावसाने मारलेली दडी, यामुळे खरीप हंगामातून अवघे तीस टक्केही उत्पादन हाती लागेल की नाही, अशी शंका आहे. लष्करी अळीमुळे मक्याचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी हतबल झाले आहेत. कृषी विभागातर्फे मार्गदर्शन आणि फवारणीच्या मात्रांचे आवाहन करण्यात येत आहे. 

फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) अर्थात स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड आहे. लष्करी अळी सुरवातीला पाने खाऊन आपली उपजीविका करते. नंतर मक्याच्या कणसात प्रवेश करून संपूर्ण पीक उध्वस्त करून टाकते. ३० ते ८० दिवसांत जीवनक्रम पूर्ण होत असल्यामुळे एका पिकात तीन ते चार पिढ्या सहज पूर्ण होतात.    

प्रभावी उपाययोजना करा

अमेरिकन लष्करी अळीचा अटकाव करण्यासाठी कीटकनाशके महाग आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. ही कीटकनाशके अनुदानावर उपलब्ध करावीत. पाऊस अधिक आहे. यात इतर पिकांची हानी झाली आहे. मका पिकाची स्थिती बरी होती, पण तेदेखील हातचे जात आहेत. यामुळे कीटकनाशके तातडीने उपलब्ध करावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com