agriculture news in marathi Infestation of fruit borer larvae on okra | Agrowon

भेंडीवर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

डॉ.धीरजकुमार कदम, डॉ.संजोग बोकन
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

भेंडी पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. 
 

भेंडी पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. 

शेंडे व फळे पोखरणारी अळी ( इयरीस व्हिटेला)

 • ही भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड आहे. ती वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता व जास्त उष्ण तापमान या किडीला पोषक असते. 
 • अळी तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. सुरवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याना पोखरून आत भुयार तयार करते. प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो. अळीने पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडतात. 
 • फळावर अळीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते, तर प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात. फळांची वाढ होत नाही. अशी फळे विक्री योग्य राहत नाहीत. 

एकात्मिक नियंत्रण

 • कीडग्रस्त फळे तोडून आतील अळीसह नष्ट करावे.
 • फळ पोखरणारी अळी व शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. 
 • शेतात एकरी १० पक्षी थांबे लावावेत. 
 • सुरवातीच्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा. त्यामुळे ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचे संरक्षण होऊन हानिकारक किडीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होईल. 
 • ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
 • सध्या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे बिव्हेरिया बॅसियाना (१ टक्के डब्ल्यूपी) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे प्रभावी व्यवस्थापन होईल.
 • फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, एचएएनपीव्ही (२५० एलई) या विषाणूजन्य कीटकनाशकाची ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.
 • रासायनिक कीटकनाशकाची फवारणी फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर पावसाची उघडीप असताना करावी.

फळे पोखरणारी अळी  (हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा) 

 • कीड बहुभक्षी असून, भेंडीशिवाय कापूस, तूर, टोमॅटो इ. अनेक पिकावर उपजीविका करते. 
 • प्रौढ मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फळावर ३०० ते ५०० अंडी देते.  
 • ५ ते ७ दिवसात या अंड्यातून बाहेर पडणारी अळी फळे पोखरून अनियमित आकाराची छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आत ठेऊन आतील भाग खाते. अळीची पूर्ण वाढ होण्यास १४ ते १५ दिवसाचा कालावधी लागतो.
 • अळीचा रंग हिरवट असतो. पिकानुसार अळीच्या विविध रंगछटा दिसून येतात. तिच्या शरीरावर तुरळक केस व तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात. 
 • अळी जमिनीत झाडाच्या वेष्टणात कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवड्यापासून महिनाभर असू शकते.

आर्थिक नुकसान पातळी 

 • शेंडा व फळ पोखरणारी अळी : ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त फळे
 • फळ पोखरणारी अळी : १ अळी प्रति झाड

फवारणीः  प्रति लिटर पाणी

 • शेंडा व फळ पोखरणारी अळी  
 •  इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.२७ ग्रॅम किंवा 
 • लॅबडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी)  ०.६ मिलि 

फळ पोखरणारी अळी 

 • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मिलि किंवा
 •  लॅबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.६ मिलि
 • हे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.  

टीप ः सर्व कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे. 

संपर्क : डॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक ), ९४२१६२१९१०    
डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२०००
( कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...