Agriculture news in Marathi Infestation of Spodoptera frugiparda larvae in maize crop | Agrowon

मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

जिल्ह्यात अनेक भागांत मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी चिंतेत आहेत. कमी पावसाने पीक हातचे गेले आहे. तर जेथे पीक बरे आहे, तेथे नुकसान होत आहे.

शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी चिंतेत आहेत. कमी पावसाने पीक हातचे गेले आहे. तर जेथे पीक बरे आहे, तेथे नुकसान होत आहे. अळीचा प्रसार रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करीत आहे. 

मक्याची लागवड शिरपूर, साक्री, धुळे भागांत झाली आहे. ही लागवड सुमारे १० हजार हेक्टरवर आहे. यातील ७० टक्के क्षेत्रात लष्करी अळीचा प्रकोप दिसत आहे. गेले १० दिवस शेतकरी अळी नियंत्रणासाठी कीडनाशक फवारणी व इतर उपाययोजना करीत आहेत. पण अळी नियंत्रणात येत नसल्याची स्थिती आहे. सुमारे २० ते २५ टक्के नुकसान पिकात झाले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे. विविध कंपन्यांचे अधिकारी, तज्ज्ञदेखील पाहणी करीत आहेत. कामगंध सापळे व फवारणीचा सल्ला दिला जात आहे. यामुळे उत्पादनही घटेल, अशी स्थिती आहे. शिरपूर तालुक्यात पीक अधिक असून प्रकोपही अधिक आहे. 

कृषी विभागानुसार, खरिपात मक्याची लागवड बऱ्यापैकी झाली. या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. ही कीड बहुभक्षीय असून, तिचा प्रसार झपाट्याने होतो. तिच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर, त्याच किडीचे (स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा) ल्यूर तसेच अंडीनाशक म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा. फवारणीसाठी बिव्हेरिया बॅसियाना किंवा नोमुरिया या जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यामुळे ट्रायकोडर्मा व परभक्षी या नैसर्गिक शत्रूकीटकांचे संवर्धन होण्यास मदत होईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. या संदर्भात मंडल कृषी अधिकारी तुषार बैसाणे, योगेश सोनवणे, सुधीर ईशी, आर. डी. मोरे मार्गदर्शन करीत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...