भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भाव

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक कापणीनंतर लगेच उन्हाळी भातासाठी रोपवाटिका केली जाते. भात शेती बांधावर असणाऱ्या तणांवर खोड कीड उपजीविका करतात. यामुळे सध्याच्या काळात रोपवाटिकेमध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे.
infestation of steam borer in paddy nursery
infestation of steam borer in paddy nursery

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक कापणीनंतर लगेच उन्हाळी भातासाठी रोपवाटिका केली जाते. भात शेती बांधावर असणाऱ्या तणांवर खोड कीड उपजीविका करतात. यामुळे सध्याच्या काळात रोपवाटिकेमध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. खोडकिडा 

  • पतंग १-२ सें. मी. लांब, समोरील पंख पिवळे, मागील पांढरे
  • मादी पतंगाच्या पंखाच्या खालील भागावर प्रत्येकी एक काळा ठिपका
  • नर पतंगाच्या पंखावर ठिपका नसतो.
  • पूर्ण वाढ झालेली अळी भाताच्या खोडात कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९ ते १२ दिवसांची.
  • नुकसान

  • रोपवाटिकेमध्ये अळी सुरुवातीस काही वेळ पानाच्या कोवळ्या भागावर उपजीविका करते.
  • नंतर खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते. परिणामी, फुटवा सुकण्यास सुरुवात होते. रोपाचा गाभा मरतो.
  • आर्थिक नुकसान पातळी

  • पुनर्लागवड झाल्यानंतर लगेच : ५ टक्के सुकलेले फुटवे किंवा १ अंडीपुंज प्रती चौ.मी.
  • फुटव्याच्या मध्यावस्थेत : ५ टक्के सुकलेले फुटवे
  • नियंत्रण

  • पुनर्लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे तोडून बांबूच्या टोपलीत जमा करावे. ती टोपली खांबावर टांगावी. त्यामुळे रोपाच्या शेंड्यावर असणारी खोड किडीची अंडी नष्ट होऊन त्यामधून परोपजीवी मित्रकीटक बाहेर पडतील.
  • पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्याच्या द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत. (कीटकनाशकाला लेबल क्लेम आहे.)
  • प्रादुर्भाव दिसताच प्रतिहेक्टरी ट्रायकोग्रामा जापोनीकम या परजीवी किडीची ५०,००० अंडी सात दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा सोडावीत.
  • कीडग्रस्त फुटवे मुळासकट काढून नष्ट करावेत.
  • रासायनिक नियंत्रणः (प्रति लिटर पाणी)

  • क्लोरपायरीफॉस (५० टक्के प्रवाही) १.६ मिलि किंवा
  • फिप्रोनील (५ टक्के प्रवाही) ३ मिलि किंवा
  • क्विनॉलफॉस ३.२ मिलि
  • (टीप- कीटकनाशकांना लेबल क्लेम आहेत.)
  • संपर्क- डॉ. प्रवीण राठोड, ७५८८९६२२११ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com