Agriculture news in marathi; Infiltration of military algae on maize in Gadchiroli | Page 2 ||| Agrowon

गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या मुलचेरा, चामोर्शी व अहेरी तालुक्‍यात मक्‍यावर प्राथमिक अवस्थेतच लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. दीड हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. केव्हीकेने संभाव्य धोका ओळखत कृषी ॲडव्हायझरी काढत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे. 

गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या मुलचेरा, चामोर्शी व अहेरी तालुक्‍यात मक्‍यावर प्राथमिक अवस्थेतच लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. दीड हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. केव्हीकेने संभाव्य धोका ओळखत कृषी ॲडव्हायझरी काढत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात धानकाढणीनंतर मका लागवड होते. पशुखाद्याऐवजी मधुमक्‍का विक्रीतून चांगले पैसे मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मका लागवडीत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्य राहिले आहे. त्यामुळेच एकट्या मुलचेरा तालुक्‍यातच ६५० ते ७०० हेक्‍टर क्षेत्रावर मक्याची लागवड होते. दरम्यान, गुरुवारी केव्हीकेचे तज्ज्ञ पुष्पक बोथीकर; तसेच मुचलेरा तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी मका पिकाची पाहणी केली. कोपरअल्ली चेक येथील शामलदार नगर यांच्या शेतातील पीकपाहणीदरम्यान मका पिकावर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वाढीच्या अवस्थेत होतो. 

दरम्यान, शेतकऱ्यांनी मका पिकाचे सर्व्हेक्षण करून पाच टक्क्यांपेक्षा अधिक झाडे प्रादुर्भावग्रस्त आढळल्यास कीड नियंत्रणाचे उपाय त्वरित करावेत. या अळीची तीस दिवसांत एक पिढी पूर्ण होते. हिवाळ्यात हा कालावधी दोन महिन्यांपर्यंत लांबू शकतो. एका वर्षात अखंड खाद्य मिळाल्यास तीन ते चार पिढ्या विविध वनस्पतींवर पूर्ण होऊ शकतात. एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पतंगांची संख्या अधिक प्रमाणावर दिसून येते. लष्करी अळी पान खाऊन पिकांचे नुकसान करते. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापुद्रा खातात, अशी माहिती पुष्पक बोथीकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी वेळोवेळी पीक निरीक्षण करण्याचा सल्लाही या पार्श्‍वभूमीवर देण्यात आला आहे. 

कामगंध सापळ्यांचा वापर करा
पतंगावर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबरच प्राधान्याने पोंगे धारण अवस्थेत लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लष्करी अळीचे जैविक नियंत्रण कसे करावे, याबाबत ही पुष्पक बोथीकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
 


इतर अॅग्रो विशेष
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...