Agriculture news in Marathi, Infiltration of military larvae on Kolhapur district accounts for fifteen percent of the area | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के क्षेत्रावरील मक्‍यावर अद्यापही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात सुमारे २८०० हेक्‍टर क्षेत्रावर विविध कालावधीतील मक्‍याचे पीक आहे. गेल्या महिन्यात अळीचे प्रमाण चाळीस टक्क्‍यांपर्यंत गेले होते. आता औषध फवारणीमुळे त्यात घट होऊन हे प्रमाण पंधरा टक्क्‍यांपर्यंत आले आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के क्षेत्रावरील मक्‍यावर अद्यापही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात सुमारे २८०० हेक्‍टर क्षेत्रावर विविध कालावधीतील मक्‍याचे पीक आहे. गेल्या महिन्यात अळीचे प्रमाण चाळीस टक्क्‍यांपर्यंत गेले होते. आता औषध फवारणीमुळे त्यात घट होऊन हे प्रमाण पंधरा टक्क्‍यांपर्यंत आले आहे. 

जिल्ह्यात केवळ मका पीक घेण्यापेक्षा उसामध्ये आंतरपीक म्हणून मक्‍याचे पीक घेतले जाते. मक्‍याचे उत्पन्न घेण्यापेक्षा चारा पीक म्हणूनच याचा वापर केला जातो. खरिपामध्ये उसाच्या क्षेत्रात मक्‍याची लागवड अनेक शेतकरी करतात. जून मध्ये ज्या वेळी लागवड झाली. त्या वेळी सुमारे पाच ते दहा टक्क्‍यांवर लष्करी अळी आढळून येत होती. या वेळी मका संशोधन प्रकल्पाच्या वतीने विविध जनजागृतीपर मेळावे घेण्यात आले होते. यानंतर कृषी विभाग व संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आले. इतक्‍या उपाययोजना करूनही अनेक शेतकऱ्यांनी वेळेत फवारणी न केल्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला. 

मध्यंतरीच्या काळात पश्‍चिम भागात अतिवृष्टी व पूर्व भागात महापुराने उसाबरोबर मका पिकाचेही नुकसान झाले. ज्या भागात मका पीक सुस्थितीत आहे त्या भागाकडेही पावसामुळे शेतकऱ्यांनी फवारणीकडे दुर्लक्ष केल्याने या अळीच्या निर्मूलनाकडे दुर्लक्ष झाले. आता बहुतांशी ठिकाणी मक्‍याची उंची पाच ते सह फूट वाढल्याने मक्‍यावर औषध फवारणी करणे अशक्‍य झाले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत औषधांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

अशास्त्रीय उपाय टाळावेत
मका संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील कराडे यांनी सांगितले की, अनेक शेतकरी अशास्त्रीय उपाय करत असल्याने अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. वाशिंग पावडरच्या द्रावणाचा वापर करून शेतकरी अळीचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या द्रावणामुळे तात्पुरत्या स्वरुपात अळी निद्रीस्त होते. परंतु काही कालावधीनंतर पुन्हा ती सक्रिय होते. हे द्रावण मक्‍यावर टाकल्याने मक्‍याची प्रत खराब होत असल्याने अशा प्रकारचे उपाय शेतकऱ्यांनी करू नयेत, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

मी उसामध्ये मक्‍याचे पीक घेतो. मक्‍याचे पीक एक महिन्याचे झाल्यानंतर ही अळी दिसण्यास प्रारंभ झाला. परंतु पावसामुळे फवारणी करणे शक्‍य झाले नाही. आता अळी तीस ते पस्तीस टक्क्‍यांवर आहे. यावर फवारणी करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
- प्रकाश पाटील, सांगरुळ, जि. कोल्हापूर 

मी प्रामुख्याने चाऱ्यासाठी मका करतो. यंदा मका उगवणीनंतर थोड्या थोड्या प्रमाणात अळी दिसण्यास प्रारंभ झाला. मी औषधांची फवारणी केली. यातून काही प्रमाणात नियंत्रण झाले. आता आणखी फवारण्या घेण्याबाबत नियोजन करत आहे. मक्‍याची उंची वाढली असली तरी त्यातूनही फवारणी घेणार आहे. 
- देवाप्पा पुजारी, तमदलगे, जि. कोल्हापूर


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...