Agriculture news in marathi Infiltration of pink bond larvae in cotton in Marathwada | Page 3 ||| Agrowon

मराठवाड्यात कपाशीत गुलाबी बोंड अळीचा शिरकाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

औरंगाबाद : मराठवाड्यात गुलाबी बोंड अळी कपाशी पिकात पुन्हा डोके वर काढत आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात काही प्रमाणात आढळून आलेल्या या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात गुलाबी बोंड अळी कपाशी पिकात पुन्हा डोके वर काढत आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात काही प्रमाणात आढळून आलेल्या या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

यंदा मराठवाड्यात कपाशी पिकाची लागवड दोन, तीन टप्यात झाली. कपाशी सध्या चांगली वाढली आहे. तिला बऱ्यापैकी बोंडे व पाते आहेत. लवकर लावलेल्या कपाशीवर सुरवातीच्या काळात जुलैमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर नियंत्रित झाली. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी आता पुन्हा शेतकऱ्यांनी कपाशी पिकांमध्ये लावलेल्या कामगंध सापळ्यात अळीचे ७ ते १० पतंग प्रतिसापळ्यात आढळून आले आहेत. शिवाय तयार २५ टक्के बोंडात गुलाबी बोंड अळी आढळून आली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहून आर्थिक नुकसानीची पातळी पाहून योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

        हे करा...

  •  एकरी किमान १० कामगंध सापळे लावा. 
  • अगोदर लावलेल्या सापळ्यातील ल्युअर चेक करून बदला 
  • सापळ्यातील पंतगांचे निरीक्षण करून ते नष्ट करा. 
  •  कामगंध सापळ्यात ७ ते ८ पतंग सतत तीन दिवस आढळल्यास बोंडाचे निरीक्षण करा
  • २० बोंडातून २ बोंडांत अळी आढळल्यास शिफारशित कीटकनाशकाची फवारणी करा.
  •  ५ कुठलेही कीटकनाशक एकापेक्षा जास्त वेळेस वापरू नये

कामगंध सापळ्याचा प्रयोग उपयोगी

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालनाअंतर्गत वानडगाव व वखारी येथे प्रतिएकरी १६ कामगंद सापळे लावून गुलाबी  बोंड अळीचे पतंग पकडण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पतंग पकडल्यामुळे बोंडामध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली नाही. त्यामुळे अळीच्या नियंत्रणासाठी सापळ्यांद्वारे पतंगांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.

गुलाबी बोंड आळीचे प्रमाण कमी दिसत असले, तरी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये. कपाशीच्या बोंडांचे, सापळ्यात अडकलेल्या पतंगांचे निरीक्षण करून तात्काळ उपाययोजना करा, फरदड घेणे टाळा.
- अजय मिटकरी, किटकशास्त्रज्ञ, केव्हीके खरपुडी जालना

 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...
प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून...पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणारपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यतापुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...