agriculture news in Marathi, inflation rate increased if 1.5 percent MSP will give, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल : रिझर्व्ह बॅंक
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. परंतु शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन महागाई वाढेल, अशी शक्यता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) वर्तविली आहे. 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. परंतु शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन महागाई वाढेल, अशी शक्यता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) वर्तविली आहे. 

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ५) वर्ष २०१८-१९ साठीचे पहिले आर्थिक धोरण जाहीर केले. या वेळी ‘‘सरकारने शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केल्यानंतर नवीन सूत्र पुढे आणले. नवीन सूत्रानुसार शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी केलेल्या खर्चाचा व्यापकपणे समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हमीभावात वाढ होऊन देशात महागाई वाढले,’’ असे आरबीआयने म्हटले आहे. 
‘‘मॉन्सूच्या हंगामात जर पावसाची तूट निर्माण झाली तर त्याचा परिणाम देशातील अन्नधान्य उत्पादनावर होईल. 

सरकारने जर दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली तर अन्नधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील. बाजारात आवक कमी होऊन दर गगनाला भिडतील त्याचा परिणाम महागाई वाढण्यावर होईल. कमाल महागाई दर हा किमान महागाई दारपेक्षा किमान ८० पॉईंटने वाढेल. तरीही या स्थितीबाबत सध्या पूर्ण माहिती उपलब्ध नसल्याने योग्य ते भाकीत वर्तविणे शक्य नाही,’’ असेही आरबीआयने म्हटले आहे.   

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...