नगरमध्ये भुसारच्या आवकेत अजूनही घट

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून भुसार मालाचे लिलाव सुरु झाले आहेत. मात्र अजूनही भुसारची फारसी आवक होताना दिसत नाही.
The inflow of bhusar into the town is still declining
The inflow of bhusar into the town is still declining

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून भुसार मालाचे लिलाव सुरु झाले आहेत. मात्र अजूनही भुसारची फारसी आवक होताना दिसत नाही. भाजीपाल्याची आवर व विक्री सुरु असली तरी अजूनही लिलावाला वेग आलेला नाही. 

कोरोना व्हायरसमुळे नगर बाजार समितीत भुसार, भाजीपाल्याचे लिलाव बंद होते. नंतरच्या काळात प्रशासनाच्या मदतीने भुसारसह अन्य लिलाव सुरु झाले, मात्र कोरोनाच्या भितीने अजूनही शेतकरीच भुसार माल विक्रीला आनत नसल्याने बाजारात भुसारची फारसी आवक नाही. गेल्या आठवडा भरात ज्वारीची १७५ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळला. बाजरीची १२० क्विंटलची आवक होऊन १७०० ते २००० रुपयांचा दर मिळाला. तुरीची १९५ क्विंटलची आवक होऊन ४२०० ते ४७०० रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची २१५ क्विंटलची आवक होऊन ३८०० ते ३८५० रुपयाचा दर मिळाला. 

लाल मिरचीची १२० क्विंटलची आवक होऊन ६३०५ ते १२३२५ रुपयाचा दर मिळाला. गव्हाची १४५ क्विंटलची आवक होऊन १७०० ते २२००, चिंचेची ८५ क्विटंलची आवक होऊन ९००० ते ११ हजार रुपयांचा दर मिळाला. मकक्याची ३९ क्विटंलची आवक होऊन १२५० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची २० क्विटंलची आवक होऊन ३५०० ते ३७००, चवळीची १७ क्विंटलची आवक होउन ८८०० रुपयांचा दर मिळला. भाजीपाल्याची आवक होत असली तरी थेट ग्राहकांना विक्री सुरु आहे. अजून फारसे लिलाव सुरु झालेले नाहीत.  चाऱ्याची आवक सुरु 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात आवक होत असते. कोरोनामुळे बंद असलेली चाऱ्याची आवक आता सुरु झाली आहे. येथे दर दिवसाला उसाची ४०० टन आवक होते. २००० ते २७०० रुपयांचा प्रती टन दर मिळत आहे. कडब्याची दोन ते तीन टन आवक होऊन ५१००, कडवळाची तीन ते चार टन आवक होऊन २३००, मक्याची ६ ते सात टन आवक होऊन २३०० रुपये, तर उसाच्या वाढ्याची २ टन आवक होऊन २२०० रुपयाचा प्रतीटन दर मिळत आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com