Agriculture news in marathi Inflows increased, demand decreased, rates stabilized | Agrowon

शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २९) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाचे सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. 

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २९) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाचे सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. राज्यासह परराज्यांतील खरिपाचे उत्पादन सुरळीत झाल्याने सर्वच भागातून आवक मुबलक होत आहे. परिणामी मागणी घटल्याने बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटन येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून घेवडा ३ टेम्पो, इंदौर येथून गाजर ८ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमुगाच्या शेंगांची २ टेम्पो, तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती.

निक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती आवक झाली होती. भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, स्थानिक मटार ५०० गोणी, तांबडा भोपळा सुमारे ५ टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, तर कांदा ६० ट्रक आवक झाली होती. आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ७० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : १००-१६०, बटाटा : १००-१३०, लसूण : ३००-७००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : १००-२००, गवार : १५०-३००, टोमॅटो : ५०-१००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : ८०-१२०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : १००-२००, कारली : हिरवी १००-१२०, पांढरी ७०-८०, पापडी : १५०-२००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ५०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ५०-१००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : ३००-३५०, गाजर : १८०- २२० वालवर : १००-२००, बीट : ८०-१००, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३००, पावटा : १५०-२००, भुईमूग शेंग : ३००-४००, मटार - ६००-७५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१६०-१८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्याचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सुमारे दीड लाख तर मेथीच्या ६० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - ३००-१०००, मेथी -३००-८००, शेपू १००-३००, कांदापात ३००-७००, चाकवत -४००-६००, करडई ३००-६००, पुदिना १००-२००, अंबाडी - ५००-६००, मुळे - ७००-११००, राजगिरा - २००-४००, चुका ५००-८००, चवळई - ४००-६००, पालक ५००-७००. 

फळबाजारात रविवारी (ता.२९) लिंबाची सुमारे दोन हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ४० टन, मोसंबी ८० टन, संत्रा १० टन, पपई ७ टेम्पो, चिकू २ हजार गोणी, पेरूची सुमारे ८०० क्रेट, सीताफळ २० टन, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी २ टेम्पो आवक झाली होती. तर सफरचंदाची सुमारे ३ हजार बॉक्स आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : २००-५००, मोसंबी : (३ डझन) : १००-१८०, (४ डझन) : ३० -८०, संत्रा : (१० किलो) : १००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१४०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : १०-१३ खरबूज : १५-२५ पपई : १०-२५, चिकू (१० किलो) १००-४५०, पेरू (२० किलो): २००-३०० सफरचंद - सिमला (३० किलो) - १७००-२५००, पिअ (१५ किलो) - ९००-१३००, नासपती (१५) ८००-९००, प्लम (२४) ३००-२५०, काश्‍मिरी डेलिशिअस (१५) - १२००-१४००. 

फूल बाजार 
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ७०-१२०, अष्टर : जुडी ४-६, सुट्टा ३०-५०, कापरी : १०-३०, शेवंती : २०- ५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-२५, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जर्बेरा : ४०-६०, कार्नेशियन : ६०- १२०, शेवंती काडी २५०-३००, लिलियम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड २००-४००, ग्लडिओ (१० काड्या) : ५०-८०. 
 

मटण मासळी 
रविवारी (ता. २९) गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीतील मासळीची सुमारे १ हजार किलो, नदीतील मासळी ३ टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे १५ टन आवक झाली होती, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. पावसाची उघडीप आणि मासेमारी हंगाम सुरू झाल्याने मासळीच्या आवकेत वाढ झाली आहे. श्रावण महिना सुरू असल्याने मटण आणि चिकनला मागणी नसल्याने दर स्थिर आहेत, असे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे तसेच चिकन विक्रेते रुपेश परदेशी यांनी सांगितले. 

खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : १४०० मोठे -१४००, मध्यम : ७५०-१०००, लहान ५५०-७५०, भिला : ३५०-५००, हलवा : ४८०-६००, सुरमई : ४००-५५०, रावस : लहान ५५०-६५०, मोठा : ७५०-८५० घोळ : ७५०, करली : २००-३२०, पाला : १०००-१५००, वाम : पिवळी : २००-७००, काळी १६०-३६०, ओले बोंबील : १००-१६०. 

कोळंबी : लहान १८०-२८०, मध्यम ३२०-४००, मोठी ४४०-५५०, जंबो प्रॉन्स : १०००-१२०० किंग प्रॉन्स : ७५०-८०० लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २००-२८०, खेकडे : २४०-३२० चिंबोºया : ४००-५५०. 

खाडीची मासळी : नगली : ३६०-४८०, तांबोशी : ४००, बांगडा : २२०-३२०, शेवटे १६०-२८०. तिसर्‍या : २००- २४०, खुबे : १००-१४०. 

नदीची मासळी : रहू : १००-१६० कतला : १००-१६०, मरळ : २८०-४००, शिवडा : २००-२८० खवली : २००-२८० आम्ळी : १००,-१६० खेकडे : २००-२८०, वाम : ४८०-५५० 

चिकन : चिकन : २००, लेगपीस : २४०, जिवंत कोंबडी : १५०, बोनलेस : ३००. 

अंडी : गावरान : शेकडा : ७३० डझन : ९६ प्रति नग : ८, इंग्लिश : शेकडा : ४३० डझन : ६० प्रतिनग : ५. 

मटण : बोकडाचे : ६६० बोल्हाईचे : ६६० खिमा : ६६०, कलेजी : ७००. 

 

 


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा...सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी,...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायमनाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये नाशिक :...
नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...