Agriculture news in Marathi Influence of adhesive on sorghum crop in the district | Agrowon

पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात सध्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर जवळपास ४० ते ५० टक्के क्षेत्रावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ज्वारी पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या जिरायत भागात उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कडब्याची प्रतही ढासळण्याची चिन्हे दिसत असून त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात सध्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर जवळपास ४० ते ५० टक्के क्षेत्रावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ज्वारी पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या जिरायत भागात उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कडब्याची प्रतही ढासळण्याची चिन्हे दिसत असून त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, खेड, बारामती या तालुक्यात प्रामुख्याने सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. जिल्ह्यात सरासरी ज्वारीचे दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ५२ हजार २४० हेक्टर म्हणजेच ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी सुमारे ६० ते ७० हजार हेक्टरवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून बदलत असलेल्या हवामानामुळे ज्वारी पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

तालुकानिहाय ज्वारीची झालेली पेरणी हेक्टरमध्ये ः
हवेली ३६३, मुळशी ६१२, भोर ११,७७६, मावळ ३५६, वेल्हे ७१, जुन्नर ९५३०, खेड १२६००, आंबेगाव ३६३३६, बारामती ४०,०००, इंदापूर ८९०६, दौड ५०६१, पुरंदर २०,५०६

माझ्याकडे सात ते आठ एकर ज्वारी पीक आहे. बदलत असलेल्या हवामानामुळे चिकट्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कणसामध्ये ज्वारीचे दाणे भरले नाही. उत्पादनात घट येण्याची शक्यता असून चाऱ्याचीही अडचण होणार आहे.
- भाऊसाहेब पळसकर, करर्डे, ता. शिरूर, जि. पुणे

हरभरा पिकांमध्ये आंतरपीक म्हणून ज्वारीचे एक एकरावर पीक घेतले आहे. त्यावर मावा आणि चिकट्याचा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यावर फवारणी केली तरी त्याचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- सुनील राजेभोसले, जोगवडी, ता. बारामती, जि. पुणे


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...