Agriculture news in Marathi, Influence of Disease on Rice Foliage | Agrowon

डोंगरपायथ्याच्या भातपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

सिंधुदुर्ग ः ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे भातपिकांवर लष्करी अळीचा प्रार्दुभाव वाढला आहे. डोंगरपायथ्याशी आणि नदीलगत असलेल्या भातपिकांवर हा प्रार्दुभाव अधिक आढळून येत आहे. सततचा पाऊस आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव अशी दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसागणिक भर पडत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाच्या खेळांमुळे कधी उष्ण-दमट; तर कधी पूर्णतः ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे भातपिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. डोंगरपायथ्याशी आणि नदीलगत असलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान लष्करी अळीकडून सुरू आहे.

सिंधुदुर्ग ः ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे भातपिकांवर लष्करी अळीचा प्रार्दुभाव वाढला आहे. डोंगरपायथ्याशी आणि नदीलगत असलेल्या भातपिकांवर हा प्रार्दुभाव अधिक आढळून येत आहे. सततचा पाऊस आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव अशी दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसागणिक भर पडत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाच्या खेळांमुळे कधी उष्ण-दमट; तर कधी पूर्णतः ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे भातपिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. डोंगरपायथ्याशी आणि नदीलगत असलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान लष्करी अळीकडून सुरू आहे.

जिल्ह्यातील नावळे, सडुरे, करूळ, आखवणे भोम, कुसूर, लोरे, कोकिसरे, कुर्ली (ता. वैभववाडी) घोणसरी, हरकुळ, नाटळ, नरडवे (ता. कणकवली) माणगाव खोरे (ता. कुडाळ) यासह दोडामार्ग तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या भातपीक परिपक्व झाले असून या पिकांच्या लोंबीच्या लोंबी ही कीड तोडत आहे.

या वर्षी अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले. शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली. त्यातून बचावलेली भातशेती आता परिपक्व झाली आहे. या भातशेतीचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पावसामुळे कापणीला आलेली भातशेती कापता येत नाही तर दुसरीकडे लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या परिपक्व शेतीवर फवारणीदेखील करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नेमके काय करावे हे सूचत नाही. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नदीलगत असलेल्या भातपिकांवर या किडीचा प्रादुर्भाव अधिक येत आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भातपिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये जाऊन लष्करी अळी, तिच्याकडून होणारे नुकसान याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. तयार झालेली भातपिके तातडीने कापावीत तर ज्या पिकांच्या कापणीला अजूनही दहा बारा दिवस लागणार आहेत. त्या पिकांवर तत्काळ कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. सध्याचे वातावरण या किडींच्या प्रादुर्भावाला अनुकूल आहे.
- एस. एम. साखरकर, कृषी पर्यवेक्षक, कृषीविभाग, वैभववाडी
 

इतर ताज्या घडामोडी
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...
महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी...मुंबई ः राज्यात भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी...
शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक...औरंगाबाद : मकानंतर आता रब्बी ज्वारीवर लष्करी...
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी...
पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४००...पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा...
मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल...नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण...
खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीतअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच...
पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार...पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे...
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के...कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने...
जालना जिल्ह्यात खरेदी केंद्रांना मिळेना...जालना : जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडीद, मक्याची...
हिंगोली : पावणेदोन कोटीचे कृषी...हिंगोली : जिल्ह्याचा २०२०-२१ या वर्षीचा संभाव्य...
सांगलीत ९९ हजार हेक्टरवर पिकांचे पंचनामेसांगली : ऑक्टोबरमधील पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे...सोलापूर : ऑक्‍टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...