Agriculture news in marathi Influence of fungal disease on wheat straw in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात गव्‍हाच्‍या ओंब्यांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

सकृतदर्शनी गव्हाच्या ओंबीवरील करपा रोग दिसत आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर निश्चित रोग निदान होईल.
- डॉ. डी. बी. देवसरकर, विस्तार शिक्षण संचालक, वनामकृवि.

परभणी : जिल्ह्यातील वर्णा (ता. जिंतूर) येथील शेतात यंदाच्या हंगामात पेरणी केलेल्या गव्हाच्या विविध वाणांवर तपकिरी तांबेरा, मावा, खोडकीड आणि ओंब्यांवरील बुरशीजन्य करपा आढळून आला. त्यापैकी ओंब्यांवरील बुरशीजन्य करपा हा रोग जिल्ह्यांमध्ये प्रथमच आढळून आला आहे, असे कर्नाल (हरियाणा) आणि निफाड (जि.नाशिक) येथील गहू संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी (ता.१९) सांगितले.

शेतकऱ्यांनी प्रादुर्भावग्रस्त गहू पीक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी शास्‍त्रज्ञांकडे निरीक्षणासाठी पाठविले. या रोगाचे निदान करण्यासाठी गुरुवारी (ता.१९) कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. टी. आपेट, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. एम. एस. दडके, कर्नाल (हरियाणा) येथील गहू संशोधन संचालनालयाचे डॉ. विकास गुप्ता, गहू पैदासकार डॉ. रवींद्र कुमार, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत निफाड (जि. नाशिक) येथील गहू संशोधन केंद्राचे पैदासकार डॉ. एस. एस. दोडके, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. भानुदास गमे, जिंतूरचे तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे आदींच्या पथकाने वर्णा येथे गहू पिकांची पाहणी केली.

वर्णा येथील शेतकऱ्यांनी गहू पिकांच्‍या जीडब्ल्यू-४९६, एमएसीएस-६२६५, एमएसीएस-२४९६ आणि जीके-७७७७ या वाणांची पेरणी केली आहे. गव्हाच्या सर्वच क्षेत्रांवर तपकिरी तांबेरा, मावा, खोडकीड आणि ओंबीवरील बुरशीजन्य करपा आढळून आला आहे.

डॉ. आपेट, डॉ. दडके व डॉ. गमे यांच्या मतानुसार तांबेरा, मावा, खोडकीड आणि ओंब्यांवरील करपा यांचा संयुक्त परिणाम म्हणून ओंब्यांवरून खालील भागाकडे वाळत गेल्या आहेत. पानातील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे असा परिणाम झाल्याचे दिसून आले, असे सर्व तज्ज्ञांनी सांगितले.

गव्हाच्या काढणीनंतर काड जाळून बुरशीचे अवशेष नष्ट करावे. खोल नांगरट करावी. असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...