Agriculture news in marathi; Influence of pesticide on Vidarbha crops | Agrowon

विदर्भात पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नागपूर  ः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यावर्षी समाधानकारक पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली असतानाच काही भागांत कपाशीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सोयाबीनदेखील किडी- रोगांनी पोखरल्या गेले आहे. कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने मात्र कीडरोग आवाक्‍यात असल्याचा दावा करीत ते नुकसान पातळीच्या खालीच असल्याचे सांगितले. 

नागपूर  ः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यावर्षी समाधानकारक पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली असतानाच काही भागांत कपाशीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सोयाबीनदेखील किडी- रोगांनी पोखरल्या गेले आहे. कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने मात्र कीडरोग आवाक्‍यात असल्याचा दावा करीत ते नुकसान पातळीच्या खालीच असल्याचे सांगितले. 

जून महिन्यात उघडीप देणाऱ्या पावसाने त्यानंतर जोरदार कमबॅक केले. ऑगस्ट पूर्ण महिन्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे. काही भागात नुसते ढगाळ वातावरणही अनुभवले जात आहे. ढगाळ वातावरणाच्या परिणामी सोयाबीन तसेच कापसावर कीडरोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सध्या कापसावर रसशोषक मावा, तुडतुडे दिसू लागले आहेत. सोयाबीनवर देखील अळ्यांचा प्रादुर्भाव असला तरी त्यांची पातळी नुकसानीच्या खाली असल्याचे सांगितले जात आहे.

कपाशीवर जून महिन्यात अकोला तसेच यवतमाळ जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यानंतर मात्र क्रॉपसॅप अंतर्गत कोठेच गुलाबी बोंड अळीची नोंद झाली नाही, असेही कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. पावसाने उघडीप दिल्यास पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये लष्करी अळी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

परभणी जिल्ह्यात हिरवी बोंड अळी
परभणी जिल्ह्यात कापसावर हिरवी बोंड अळी दिसून आली आहे. कृषी विद्यापीठ सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. बीटी वाणांवर हिरव्या बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. विदर्भात मात्र हिरव्या बोंड अळीचा अद्याप शिरकाव झाला नाही, असेही सांगण्यात आले.

सध्या तरी पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव संदर्भाने विशेष तक्रारी नाहीत. कापसावर तुडतुडे असल्याची नोंद क्रॉपसॅपमध्ये घेण्यात आली आहे. सोयाबीनवर विशेष कीडरोग संदर्भाने अद्याप तरी तक्रारी नाहीत. धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

इतर ताज्या घडामोडी
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार...सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्...
बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख...बुलडाणा  ः  जिल्ह्याच्या रब्बी...
वेतोरेतील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसानसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि...
परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
चौथ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळनाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी...
परभणीत हरभरा पीक व्यवस्थापनासाठी २१९...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (...
बाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पुणे, मुंबई बाजार समित्यांच्या निवडणुका...पुणे ः राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणांमुळे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे ५० टक्के...सिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार...
पुणे बाजार समितीत स्थानिक नव्या...पुणे  ः पावसामुळे बटाट्याचे आगार असलेल्या...
पुणे विभागात रब्बीचे क्षेत्र दीड लाख...पुणे  ः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात...
आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १६ हजार...मंचर, जि. पुणे  : अतिवृष्टीमुळे आंबेगाव...
सातारा जिल्ह्यात खरिपासाठी ७८ टक्के...सातारा  ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९२०...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साडेचार लाख...नगर  ः अतिवृष्टीने जिल्ह्यातील १५८३ गावांतील...
अकोट तालुक्यातील केळी उत्पादकांचा...अकोला  ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळी...
राज्यात शेतकरी मदत केंद्रे उभारणार :...कडेगाव, जि. सांगली  : अतिवृष्टी व...
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचेच सरकार...नागपूर  ः राज्यात शिवसेना, काँग्रेस,...