दिंडोरी तालुक्यात स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळीचा प्रादुर्भाव

दिंडोरी तालुक्यात स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळीचा प्रादुर्भाव
दिंडोरी तालुक्यात स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळीचा प्रादुर्भाव

नाशिक : द्राक्षबाग छाटणी केल्यानंतर पोंगा अवस्थेमध्ये नवीन फुटीवर स्पोडोप्टेरा लिट्यूरा या आळीचा प्रादुर्भाव दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आला आहे. त्यामुळे थेट क्षेत्रावर जाऊन कृषी विभागाकडून शनिवार (ता. ५) पाहणी करण्यात आली.  वरखेडा, घोडेवाडी शिवारात काही बागांची प्राथमिक पाहणी केली. त्यानुसार अळीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागात झाल्याचे निदर्शनास आलेला आहे. ही कीड रात्रीच्या वेळेस द्राक्ष पिकाचे कोवळे डोळे-घड यांचे नुकसान करत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर नाठे, के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्रा. तुषार उगले, कृषी सहायक श्री. पवार यांनी पाहणी केली.  रेसिड्यू व्यवस्थापन आणि निर्यातीच्या दृष्टीने योग्य कीटकनाशकांची निवड करावी. जमिनी लगतची आळी खोडांवर जाऊ नये म्हणून खोडास चिकटपट्टी लावल्यास द्राक्ष वेलींचे रक्षण करणे सहज शक्य आहे. बाग छाटणी पूर्वी बागेत प्रतिएकर १० एकर कामगंध सापळे लावल्यास पतंगाचे नियंत्रण करून किडीचे जीवनचक्र थांबवता येईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. आशा सूचना द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आल्या.  शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता प्राथमिक अवस्थेत योग्य जैविक कीटकनाशकांचा व पारंपरिक उपायांचा अवलंब केल्यास सदर अळीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, तसेच जास्त प्रादुर्भाव आढळल्यास शासनमान्य कीटकनाशकांची फवारणी करुणेबाबत तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com