Agriculture news in marathi; Influence of Spodoptera littera alii in Dindori taluka | Page 2 ||| Agrowon

दिंडोरी तालुक्यात स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : द्राक्षबाग छाटणी केल्यानंतर पोंगा अवस्थेमध्ये नवीन फुटीवर स्पोडोप्टेरा लिट्यूरा या आळीचा प्रादुर्भाव दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आला आहे. त्यामुळे थेट क्षेत्रावर जाऊन कृषी विभागाकडून शनिवार (ता. ५) पाहणी करण्यात आली. 

नाशिक : द्राक्षबाग छाटणी केल्यानंतर पोंगा अवस्थेमध्ये नवीन फुटीवर स्पोडोप्टेरा लिट्यूरा या आळीचा प्रादुर्भाव दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आला आहे. त्यामुळे थेट क्षेत्रावर जाऊन कृषी विभागाकडून शनिवार (ता. ५) पाहणी करण्यात आली. 

वरखेडा, घोडेवाडी शिवारात काही बागांची प्राथमिक पाहणी केली. त्यानुसार अळीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागात झाल्याचे निदर्शनास आलेला आहे. ही कीड रात्रीच्या वेळेस द्राक्ष पिकाचे कोवळे डोळे-घड यांचे नुकसान करत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर नाठे, के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्रा. तुषार उगले, कृषी सहायक श्री. पवार यांनी पाहणी केली. 

रेसिड्यू व्यवस्थापन आणि निर्यातीच्या दृष्टीने योग्य कीटकनाशकांची निवड करावी. जमिनी लगतची आळी खोडांवर जाऊ नये म्हणून खोडास चिकटपट्टी लावल्यास द्राक्ष वेलींचे रक्षण करणे सहज शक्य आहे. बाग छाटणी पूर्वी बागेत प्रतिएकर १० एकर कामगंध सापळे लावल्यास पतंगाचे नियंत्रण करून किडीचे जीवनचक्र थांबवता येईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. आशा सूचना द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आल्या. 
शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता प्राथमिक अवस्थेत योग्य जैविक कीटकनाशकांचा व पारंपरिक उपायांचा अवलंब केल्यास सदर अळीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, तसेच जास्त प्रादुर्भाव आढळल्यास शासनमान्य कीटकनाशकांची फवारणी करुणेबाबत तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 

इतर बातम्या
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता...सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी...
राज्यात रब्बीसाठी सव्वासहा हजार शेतीशाळापुणे : रब्बी हंगामात राज्यात सव्वासहा...
केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा...पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी,...
बाजार समित्या बरखास्त करणार : केंद्रीय...नवी दिल्ली : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि...
राज्य झाले टॅंकरमुक्त; केवळ बुलडाण्यात...पुणे: मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात...
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार;...औरंगाबाद : गंध आणि चवीसाठी केसर आंब्याची आपली...
किमान तापमानात चढ-उतारपुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...