Agriculture news in marathi, Influence of succulent moths on pomegranate in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक पतंगांचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

आमचा डाळिंब उत्पादक गट आहे. त्या माध्यमातून युरोपला डाळिंबाची निर्यात करतो. परंतू कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर कीटकनाशकाची फवारणी करणे अवघड झाले आहे. रसशोषक पतंगामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान होत आहे. 
- विजय मरगळे, डाळिंब उत्पादक, बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली.

सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या बागेत रसशोषक पतंगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे डाळिंबाचे २० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. सुरवातीच्या काळात पाणीटंचाई असल्याने टॅंकरद्वारे पाणी देऊन बागा जगविल्या. मृग हंगामातील बहार धरला. परंतु पाण्याची कमतरता असल्याने झाडाला फळांची संख्या कमी झाली. त्यातूनही दर्जेदार डाळिंब आणले. गेल्या आठवड्यात दुष्काळी पट्ट्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस बरसला. शेतकरी आनंदी झाला. परंतू हा पाऊस डाळिंबासाठी फायद्याचा ठरत असला तरी, रसशोषक पतंगाने त्यावर घाला घातला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मृग हंगामातील डाळिंब फळाचे वजन २०० ते २५० ग्रॅम झाले असून एका महिन्यात डाळिंबाची काढणी होणार आहे. रसशोषक पतंग कीटक दिवसा गवतात लपून बसतो. रात्रीच्या वेळी तो फळावर हल्ला करतो. या कीटकाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी फवारणीचा उपाय करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र दुसरीकडे डाळिंब युरोपला निर्यात होत असल्याने कीटकनाशकांचा वापर करण्यावरही मर्यादा येत आहेत. यामुळे डाळिंब फळाचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. शेतकरी बागेत सापळ्यांचा वापर करूनही किडीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...