agriculture news in Marathi, Information about Beneficiary Beneficiaries is not available | Agrowon

ताकारीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नाही

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मार्च 2019

सांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात किती शेतकरी समाविष्ट आहेत, त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याने पाणीपट्टी कशी वसूल करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांनी यादी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाणीपट्टीची थकीत वाढली आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाच्या कामावर पुन्हा एकदा शंका उपस्थित झाली असून, यादी करण्यासाठी कधी जाग येणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

सांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात किती शेतकरी समाविष्ट आहेत, त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याने पाणीपट्टी कशी वसूल करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांनी यादी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाणीपट्टीची थकीत वाढली आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाच्या कामावर पुन्हा एकदा शंका उपस्थित झाली असून, यादी करण्यासाठी कधी जाग येणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

ताकारी उपसा सिंचन प्रकल्पात एकूण २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये कडेगाव, तासगाव, वाळवा आणि खानापूर तालुक्यांचा समाविष्ट आहे. त्यापैकी १० हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. योजनेचे आवर्तन सुरू केल्यास शेतकऱ्यांना पाणी मिळते. यामुळे ऐन टंचाईत पाणी मिळाल्याने बळिराजा आनंदी आहे. या योजनेत प्रत्यक्ष पाच साखर कारखाने समाविष्ट आहेत. तर, याच लाभ क्षेत्रातील शेतकरी इतर साखर कारखान्यांनादेखील ऊस गाळपाला देतात. कारखान्यांच्या मार्फत पाणीपट्टी जमा होते. त्याचे कारण म्हणजे साखर कारखान्यांकडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची यादी आहे. त्यानुसार कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून पाणीपट्टीची कपात करून ती पाटबंधारे विभागाकडे वर्ग करतात. 

परंतु, याच कारखान्याकडून गेल्या वर्षीची १ कोटी २५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. ही थकलेली पाणीपट्टी कारखाने जमा करतील. पण, या योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची यादी करणे आवश्यक होते. परंतु ही यादी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुढाकार घेतलेला नाही. पाटबंधारे विभागाकडे केवळ क्षेत्राचीच नोंद आहे. वास्तविक पाहता आज शेतीची विभागणी झाली आहे. त्यामुळे पूर्वी एकाच शेतकऱ्याचे नाव हे पाटबंधारे विभागाकडे नोंद आहे. परंतु शेतीची विभागणीनुसार  त्यामुळे केवळ क्षेत्राची नोंद असून उपयोग नाही, तर शेतकऱ्यांची यादीदेखील असणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची यादी आणि पिकाची यादी केल्यास पाणीपट्टी वसूल करण्यास सोपे होईल.

वास्तविक पाहता ताकारी योजनेतील शेतकऱ्यांची यादी अद्यापही तयार नाही, अशी स्थिती जिल्ह्यातील टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची असल्याचे पाहावयास मिळते आहे. या प्रकल्पाची वाढती थकबाकी पाहून पाटबंधारे विभागाला कधी जाग येणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

यादी तयार केल्यास काम सुलभ 
शेतकऱ्यांची यादी तयार केल्याने शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे, त्यासाठी किती पाण्याचा वापर केला आहे, किती पाणीपट्टी थकली आहे, याची सर्व माहिती यातून मिळणार आहे. शेतकऱ्यांची यादी करणे आतापासून प्रारंभ केला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.


इतर बातम्या
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...