agriculture news in Marathi, information about cost of rural development works now available on one click, Maharashtra | Agrowon

ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची माहिती एका क्लिकवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील विकासकामांसाठी वर्षभरात राज्य-केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून किती निधी मिळाला आणि तो गाव विकासाच्या कोणत्या कामांवर किती खर्च झाला याची सविस्तर माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाने या संदर्भातील संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकतेस्थळावर देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही गावाला मिळालेल्या निधीची आणि खर्चाची इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. 

मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील विकासकामांसाठी वर्षभरात राज्य-केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून किती निधी मिळाला आणि तो गाव विकासाच्या कोणत्या कामांवर किती खर्च झाला याची सविस्तर माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाने या संदर्भातील संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकतेस्थळावर देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही गावाला मिळालेल्या निधीची आणि खर्चाची इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. 

सध्या ग्रामपंचायतींना गावच्या विकासकामांसाठी केंद्र शासनाच्या चौदावा वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध विकास योजनांमधूनही भरपूर निधी उपलब्ध होत आहे. या निधीचा वापर गावच्या योग्य आणि मूलभूत विकास कामांसाठी होतो की नाही हा मुद्दा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा असतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाने एक संकेतस्थळ विकसित केले आहे. 

http://www.planningonline.gov.in असा या संकेतस्थळाचा पत्ता आहे. यावर देशातील प्रत्येक राज्य, राज्यांमधील जिल्हे आणि गावे यांची वर्षभरातील वित्तीय माहिती देण्यात आली आहे. तसेच, ही माहिती वर्षनिहाय देण्यात आली आहे. सुरवातीला वर्ष, राज्य निवडावे, त्यानंतर जिल्हा आणि स्वतःचे गाव निवडले की ही विकासकामांवर किती निधी खर्च झाला याची माहिती काही क्षणात नजरेपुढे येते.

या निधीचा स्रोत काय आहे, केंद्र अथवा राज्य सरकारकडून मिळाला की ग्रामपंचायतीने स्वतःच्या तिजोरीतून खर्च केला याची ही माहिती देण्यात आली आहे. संबंधित कामाचे स्वरूप काय होते, त्याला ग्रामसभेची शिफारस आहे काय तसेच ग्रामपंचायतीने मान्यता दिलेली आहे काय याचीही माहिती इथे उपलब्ध आहे. संबंधित काम कुणामार्फत करून घेण्यात आले याचे तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ग्रामपंचायतीमार्फत वर्षभरात जितकी काय विकासकामे केली जातात, त्यावर झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

अनेकदा गावपातळीवर गटातटाच्या राजकारणातून सत्ताधारी स्वतःच्या वॉर्डात विकासकामांवर जोर देतात. विरोधकांच्या वॉर्डात विकासकामांसाठी निधी दिला जात नाही किंवा अत्यल्प दिला जातो. तसेच, निधी खर्चाची माहिती देण्यातही टाळाटाळ केली जाते. विकासकामांच्या नावाखाली अनेकदा निधीमध्ये गैरव्यवहारसुद्धा होण्याची शक्यता असते. मात्र, या नव्या संकेतस्थळामुळे गावातील प्रत्येक नागरिक एका क्लिकवर गावात झालेल्या विकासकामांवरचा खर्च अगदी एका क्षणात पाहू शकतो. त्यामुळे गावच्या कारभारात पारदर्शकता येण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासही मदत होणार आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...