सोलापूर : ‘सन्मान'च्या माहितीतील दुरुस्ती सुरू

‘सन्मान'च्या माहितीतील दुरुस्ती सुरू
‘सन्मान'च्या माहितीतील दुरुस्ती सुरू

सोलापूर : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागवून घेतले. एक लाखापर्यंतच्या खातेदार शेतकऱ्यांची माहिती भरण्यात आली; पण त्यापैकी जवळपास त्रुटी पूर्तता करण्यासाठी ६० हजार २९० शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारकडून परत पाठविण्यात आली होती. त्यापैकी ३५ हजार ९२९ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्ती करून सादर करण्यात आली. उर्वरित कामही सुरूच आहे. पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे कधी वाटप होणार, याच्या हालचाली मात्र काहीच नाहीत. दुरुस्तीबरोबर तेही काम सुरू राहावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

लोकसभा निवडणुकी आधी काही मोजक्‍याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये जमा करण्यात आले. पण नावे, उताऱ्यातील अनेक त्रुटीमुळे प्रस्ताव प्रलंबित राहिले. त्यात निवडणुकांमुळे या कामात अडचणीही आल्या. पण, सुमारे ३५ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या प्रस्तावातील महिती दुरुस्त करण्यात आली. आता उर्वरित शेतकऱ्यांच्या माहितीचीही दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू आहे.

निधीचे लवकरच वाटप आतापर्यंत उत्तर सोलापूर तालुक्‍यातील ३२८, बार्शीतील २९११, दक्षिण सोलापूरमधील १४२८, अक्कलकोटमधील १३७५, माढ्यातील ४८३४, करमाळ्यातील १८८७, पंढरपुरातील ७०७५, मोहोळमधील ४७२५, मंगळवेढ्यातील ३९६७, सांगोल्यातील ३४०६, माळशिरसमधील ३९९३ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त करून ३० एप्रिललाच यादी अंतिम करण्यात आली आहे. लवकरच त्याचे वाटप सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com