agriculture news in Marathi information of four villages not available on crop insurance website Maharashtra | Agrowon

पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची माहिती गायब 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांची माहिती पीकविमा पोर्टलवर दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ तयार झाला आहे.

बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांची माहिती पीकविमा पोर्टलवर दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ तयार झाला आहे. एक जुलैपासून यंदाच्या हंगामासाठी पीकविमा भरण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी विमा भरण्याचा प्रयत्न केला असता हा मुद्दा समोर आला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, सोनाळा, लाडणापूर या गावांतील भाग दोनमध्ये येणाऱ्या तसेच एकलारा गावातील काही शेतकऱ्यांची माहिती सध्या पोर्टलवर उपलब्ध नसल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शेतकरी पीकविमा काढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या गावातील काही शेतकरी शुक्रवारी (ता. ३) सीएससी केंद्रावर प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पीकविम्याच्या साइटवर या चार गावांतील शेतकऱ्यांची नावेच नव्हती. गट क्रमांक, सर्व्हे क्रमांक टाकला तर त्याठिकाणी दुसऱ्या व्यक्तींची नावे येत आहेत. या भागातील शेतकरी फळपीक विमा उतरविण्यासाठी घाई करीत आहेत. परंतु, पीकविमा काढण्याच्या शेवटच्या टप्प्यात ही तांत्रिक अडचण समोर आल्याने गोंधळ वाढला आहे. 

याबाबत काही शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाला माहिती दिली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेचे बुलडाणा जिल्ह्याचे काम रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे आहे. ही चूक नेमकी कोणाकडून झालेली आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. 

गेल्या हंगामात सोनाळा येथील भाग दोनची माहिती दिसत नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. या वेळी पुन्हा सोनाळासह इतर तीन गावांतील शेतकऱ्यांबाबत असेच घडलेले आहे.

प्रतिक्रिया...
तालुक्यातील चार गावांमधील शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे माहिती दिली आहे. तसेच कृषी आयुक्तालयाकडेही गेल्या १५ दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. 
- अमोल बनसोडे, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर 


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...