अकोल्यातील १५ बाजारांत होणार पायाभूत सुविधा

अकोल्यातील १५ बाजारांत होणार पायाभूत सुविधा
अकोल्यातील १५ बाजारांत होणार पायाभूत सुविधा

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील १५ अाठवडी बाजारांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. यासाठी जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना माहिती पाठविण्याबाबतचे निर्देश प्रशासनाने दिले अाहेत. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आहे. त्याच्या यशापयशावर पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती मिळाली.

मजुरांना मजुरी मिळावी, या उद्देशाने ही योजना राबवली जाते. यंदा दुष्काळी परिस्थिती अाहे. अकोला जिल्ह्यातही पाच तालुक्यांचा दुष्काळात समावेश आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, या उद्देशाने अाठवडी बाजारात विकासकामे केली जाणार अाहेत. याद्वारे मजुरांना कामे मिळतील. अकोट तालुक्यातील मुंडगाव, चोहोट्टा बाजार, दहीहांडा, केळीवेळी, तेल्हारा तालुक्यांतील हिवरखेड, अडगाव, माळेगाव बाजार, अकोला तालुक्यांतील बोरगावमंजू, कुरणखेड, बार्शीटाकळी तालुक्यांतील पिंजर, बार्शीटाकळी, बाळापूर तालुक्यांतील वाडेगाव व पारस, तर मूर्तिजापूर तालुक्यांतील माना येथील बाजाराची निवड करण्यात अाली.

या बाजाराच्या ठिकाणी सर्वेक्षण करून तेथील अावश्यक सुविधांची माहिती पाठविण्याचे निर्देश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगाह हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले अाहेत. मनरेगातून नवीन रस्ते, नाल्या, बोअरवेल, दुकान अोटे अादी कामे केली जातात.

प्रशासनाने निवड केलेल्या गावातील अाठवडी बाजार हे त्या-त्या भागातील मोठे बाजार अाहेत. याठिकाणी मोठी उलाढाल होते. मात्र पायाभूत सुविधा नसल्याने व्यापाऱ्यांना, ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो. या योजनेतून पायाभूत सुविधा तयार झाल्यास ग्रामीण भागातील व्यापारी, ग्राहकांना फायदा होईल. हा विचार करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात अाला अाहे. गटविकास अधिकाऱ्यांतर्फे बाजारांतील कामांच्या गरजेबाबतची माहिती मिळल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com