agriculture news in Marathi, Ingestion of vegetables at Gultekdi; Rate stable | Agrowon

गुलटेकडी येथे भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 जून 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची अवघी सुमारे १३० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत आटल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली असून, विविध भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर आहेत. तर कांद्याची मागणी वाढत असल्याने दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे.  

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची अवघी सुमारे १३० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत आटल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली असून, विविध भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर आहेत. तर कांद्याची मागणी वाढत असल्याने दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे.  

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतील आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून सुमारे २ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ६ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटकमधून श्रावणी घेवडा सुमारे २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी, तर इंदूर येथून गाजर सुमारे ६ टेम्पो आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टोमॅटो अवघे सुमारे २ हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० टेम्पो, तर कोबी आणि ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, भेंडी १० टेम्पो, गावरान कैरी सुमारे ८ टेम्पो, उन्हाळी भुईमूग सुमारे १५० गोणी, तसेच कांदा सुमारे ८० ट्रक, तर स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा - १२०-१४०, बटाटा- १००-१६०, लसूण - ४००-७००, आले : सातारी ६५०-७५०, भेंडी : १००-२००, गवार : २००-३००, टोमॅटो - २००-२५०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ४५०-६५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-१६०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : ३०० -३२०, पडवळ : ३४०-३५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १००-१३०, वांगी : १०० -२००, डिंगरी : १४० -१५०, नवलकोल : १२० -१४०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ३४०-३५०, गाजर : परराज्य १४०- १६०, स्थानिक - २००-२५० वालवर : ३००-३२०, बीट : ८०-१२०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १०० -१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १४० -१५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३०० -३५०, पावटा : ६०० -६५०, मटार : ७५०-८००, तांबडा भोपळा १००-१२०, चिंच अखंड ३०० -३५०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

फळबाजार
रविवारी (ता. २) मोसंबी सुमारे ३० टन, संत्री २ टन, डाळिंब १५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, चिकू २ हजार डाग, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज २० टेम्पो आवक झाली होती. तर कोकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे ७०० ते हजार पेटी आवक झाली होती. तर कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे २० हजार पेटी, करंडीची आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७००-११००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३२०, (४ डझन) : ८०-१६०, संत्रा : (३ डझन) : ३३०-४७०, (डझन ४) : १३०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश ५-२५, आरक्ता १०-२५. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई : ५-२०, चिकू : १००-६००, कोकण हापूस (४-८ डझन) तयार - १२००-२०००.

फुलबाजार
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ३०-६०, कापरी : ३०-६०, मोगरा : १२०-२००, ॲस्टर : २०-३०, (गड्डयांचे भाव) गुलाब गड्डी : २५-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१००, लिली बंडल : २-३, जरबेरा : ४०-६०, कार्नेशियन : १००-१५०.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५०० -१३००, मेथी : १०००-१३००, शेपू : ५००-८००, कांदापात : १००० -१८००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -६००, पुदिना : २०० -४००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५०० -७००, चुका : ८००-१०००, चवळई : ४०० -७००, पालक : ५०० -७००.

मटण मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २) खोलसमुद्रातील मासळी सुमारे ७ टन, खाडीची ३०० किलो, तर नदीची सुमारे २ टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम: १३००-१४००, लहान ९००, भिला : ७००, हलवा : ८००, सुरमई : ८००, रावस : लहान ६५०, मोठा : ७५०, घोळ : ७००, करली : ३६०-४००, करंदी (सोललेली) : ३६० - ४००, भिंग : ४००, पाला :  ७०० -१००० वाम : पिवळी लहान ४८०, मोठे - ७५०-८००, काळी :  ४००, ओले बोंबील :१६०-२००, कोळंबी लहान २८०, मोठी : ४४०- ४८० जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १५००, मोरी : ४००, मांदेली : १४०-१६०, राणीमासा : २४०, खेकडे : २४०-२८०, चिंबोऱ्या : ५५०-६००

खाडीची मासळी  
सौंदाळे : २८०, खापी २८०, नगली : लहान : २४० मोठी ५५०-६००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : २००, शेवटे : २८० बांगडा : लहान १४०-१५०, मोठा २००, पेडवी : १००, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : २४०, खुबे १४०- १६०, तारली : १४०

नदीची मासळी  
रहू : १४०-१६०, कतला : १६०-१८०, मरळ : ३२०, शिवडा : २००, चिलापी : ६०-८०, खवली : २००, आम्ळी: १४० खेकडे : २८०, वाम : ४८०.

मटण  
बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा: ४८०, कलेजी : ५६०.

चिकन  
चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंतकोंबडी : १४०, बोनलेस : २७०.

अंडी  
गावरान : शेकडा : ६२०, डझन : ८४ प्रति नग : ७ इंग्लिश : शेकडा : ३५० डझन: ५४ प्रतिनग : ४.५

इतर बाजारभाव बातम्या
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटलअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...