महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात वाढीसाठी पुढाकार 

आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अति घन लागवड, आंबा लवकर काढणीस तयार करणे, निर्यात योग्य आंबा उत्पादनावर भर देणे यासह महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात वाढ करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
kesar mango
kesar mango

नगर ः फळपिकांत आंबा महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अति घन लागवड, आंबा एक महिना लवकर काढणीस तयार करणे, निर्यात योग्य आंबा उत्पादनावर भर देणे यासह महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात वाढ करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी महाकेसर आंबा बागायतदार संघ पुढाकार घेणार आहे. महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व महाकेसर बागायतदार संघाचे सचिव पंडीत लोणारे यांनी सांगितले. 

महाकेसर आंबा बागायतदार संघाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या संघाची बापूसाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खानापूर (ता. शेवगाव) येथे नुकतीच बैठक झाली. ‘रोहयो’मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह संघाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत आंबा विषयावर वेगवेगळे चर्चासत्र घेणे, वेबिनार घेणे, वेगवेगळ्या जिल्हा संघाच्या बैठका घेऊन शिवार फेऱ्या करणे, दरवर्षी मे च्या पहिल्या आठवड्यात आंबा परिषद व आंबा महोत्सवाचे आयोजन करणे, संघातर्फे काही उत्तम रोपवाटिकेची प्रमाणीकरण करणे, संघातर्फे देशात व परदेशात विक्रीसाठी आंब्याचा खास ब्रँड बनविणे, प्रक्रिया, निर्यात याबाबत द्राक्ष बागायतदार संघाच्या पद्धतीप्रमाणे वाटचाल करणे, इत्यादी उत्तम गुणवत्तेबाबत चर्चा करण्यात आली. 

संस्थापक प्रतापसिंह परदेशी, डॉ. भगवानराव कापसे, सुशील भाऊ बलदवा, प्रगतिशील शेतकरी अंकुश कानडे, बजरंग जानकर, नंदू काळे, द्वारकाभाऊ पाथरीकर, वरुण पाथरीकर, विकास कापसे, हरिभाऊ शिंदे, विठ्ठल पाचरणे, सुभाष मानकर, ज्ञानेश्वर माउली, रघुनाथ जाधव आदी उपस्थित होते.  नूतन कार्यकारिणी जाहीर  महाकेसर आंबा उत्पादक संघाचे संस्थापक प्रताप सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील केसर आंबा उत्पादकांच्या झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारी करण्यात आली. अध्यक्ष ः सुशील रामपाल बलदवा (अध्यक्ष), उपाध्यक्ष ः बजरंग जानकर (सांगोला), सचिव ः पंडीत लोणारे (नगर), सहसचिव ः श्रीमती मीनाक्षी विश्वनाथ दहे, (परभणी), सदस्य ः बापूसाहेब भोसले, नंदलाल काळे, अंकुश कानडे (नगर), त्र्यंबक पाथरीकर, अशोक सूर्यवंशी (औरंगाबाद), प्रकाश कापसे (जालना), शिवाजी उगले, रसूल शेख, रमेश अहिरराव (जळगाव) आणि प्रमुख मार्गदर्शन ः डॉ. भगवानराव कापसे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com