अमरावतीत सुधारित पैसेवारीत १६५८ गावांवर अन्याय 

संततधार पावसामुळे जिल्हयात तीन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. मात्र प्रशासनाकडून केवळ दोन तालुक्‍यातील आणेवारीच ५० पैशाच्या आत जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे.
Injustice on 1658 villages in Amravati with revised paisawari
Injustice on 1658 villages in Amravati with revised paisawari

अमरावती : संततधार पावसामुळे जिल्हयात तीन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. मात्र प्रशासनाकडून केवळ दोन तालुक्‍यातील आणेवारीच ५० पैशाच्या आत जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. अमरावती व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील ३०१ गावांना या माध्यमातून न्याय मिळाला असला तरी १६५८ गावांसाठी हा प्रकार अन्यायकारक ठरला आहे. 

खरिपातील मूग, उडीद या पिकांना सुरवातीला पावसातील खंड आणि त्यानंतर पावसाची संततधार असा दुहेरी फटका बसला. त्यामुळे ही दोन्ही पिके गमावण्याची वेळ हंगामाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांवर आली. त्यानंतर ऐन काढणीच्यावेळी रोज पाऊस कोसळत असल्याने सोयाबीन गेले. कपाशीची बोंड सडली, किडरोगांनी देखील पीक पोखरले. परिणामी कपाशीची उत्पादकता देखील प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होऊ न शकल्याने ते निराश झाले होते. त्यामुळे नजर अंदाजानंतर सुधारित पैसेवारीच्या माध्यमातून दुष्काळीस्थितीचे वास्तव समोर येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु हे वास्तव सुधारित पैसेवारीमध्ये दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. यंदा पावसाळ्यात १२० पैकी ५१ दिवस पावसाचे राहिले. जिल्हयात ६५९.४ मि.मि. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७९१.६ मिमि असा १२० टक्‍के पाऊस बरसला. मेळघाट वगळता सर्व १२ तालुक्‍यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या परिणामी खरीप पिकांचे नुकसान झाले.  तालुकानिहाय्य जाहीर पैसेवारी  अमरावती : ४७  नांदगाव खंडेश्‍वर : ४८  भातकुली : ५३  तिवसा : ५४  चांदूररेल्वे : ५४  धामगावगाव रेल्वे : ५९  : ५६  वरुड : ५४  अचलपूर : ५२  चांदूर बाजार : ५२  दर्यापूर : ५३  अंजनगावसूर्जी : ५४  धारणी : ५८  चिखलदरा : ५५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com