agriculture news in marathi Inland water conservation in dryland agriculture | Agrowon

कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण

गजेंद्र आढावे, डॉ. हनुमान गरुड
शुक्रवार, 3 जुलै 2020

कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते. यामुळे जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत जमिनीची धूप थांबविणे आणि पडलेल्या पावसाचे पाणी पडेल त्या जागीच मुरविणे आवश्यक आहे.

कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते. यामुळे जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत जमिनीची धूप थांबविणे आणि पडलेल्या पावसाचे पाणी पडेल त्या जागीच मुरविणे आवश्यक आहे.

कोरडवाहू पट्ट्यात उताराच्या तसेच पडीक जमिनीवर चर खोदून वृक्ष लागवड करावी. समपातळीमध्ये मशागत करावी. जैविक बांध घालावेत. मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा. कोरडवाहू पिकांकरिता संरक्षित सिंचनाचा वापर करावा.

उताराला आडवी पेरणी 
जमिनीला नियमित उतार असलेल्या क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी करावी. अशा जमिनीवर नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच कोळपणीसारखी कामे उताराला आडवी केल्यास जमिनीच्या भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरते. जमिनीची धूप होण्याचा धोका टळतो.

जलसंधारण सरी

  • शेतात उताराला आडव्या दिशेने १० मी. अंतरावर ४५ ते ६० सेंमी रुंद व ३० सेंमी खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बैलचलित नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी कराव्यात. अशा सरीस ०.२ ते ०.४ टक्के उतार दिल्यास अतिवृष्टीच्या काळात जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यास उपयोगी पडतात.
  • दोन सरी दरम्यानच्या क्षेत्रातील पावसाचे अतिरिक्त पाणी सरीमध्ये साठविले जाते. जमिनीत मुरते. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखावी. ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपीक पद्धतीकरिता ही पद्धत उपयुक्त आहे.

उभ्या पिकात ठरावीक ओळींनंतर सरी

  • खरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात २, ४ किंवा ६ ओळींनंतर कोळप्याच्या साह्याने किंवा बळीराम नांगराने सरी काढण्यात यावी.
  • दोन सरी दरम्यानच्या क्षेत्रातील पाणी सरीत साठवून जमिनीत मुरते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पावसाचे पाणी यशस्वीरीत्या मुरविण्यासाठी या सरीचा चांगला उपयोग होतो. ३) कापूस, तूर यासारख्या पिकांमध्ये दोन ओळींनंतर; तर ज्वारी, बाजरी, सोयाबीनसारख्या कमी अंतरावरील पिकांमध्ये ४ ते ६ ओळींनंतर सरी काढण्यात यावी.

बंदिस्त सरी

  • हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर बळीराम नांगर किंवा कोळप्याने उताराला आडव्या सऱ्या काढल्याने सरीतील माती ओळीत लागून वरंबे तयार होतात. जास्त अंतरावरील पिकांसाठी ही पद्धत उपयोगी आहे.
  • पेरणीनंतरची आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर सऱ्या सलग न ठेवता सऱ्यामध्ये १० मीटर अंतरावर आडवे वरंबे तयार करावेत. आडव्या वरंब्यामुळे सरीत जमा झालेले पाणी उताराकडे न वाहता आहे तिथेच जमिनीत मुरते. कापूस, तूर यासारख्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.

रुंद वरंबा-सरी पद्धत 

  • ही पद्धत भारी जमिनीत जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
  • पिकांच्या ओळींनुसार वरंब्याची रुंदी ठेवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला बैलाच्या नांगराने सऱ्या पाडून, वरंब्यावर ओळीत पेरणी करावी. साधारणपणे पिकांच्या २ किंवा ३ ओळी वरंब्यावर येतात. सऱ्यांना ०.१ ते ०.३ टक्के उतार द्यावा. त्यामुळे जमिनीत न मुरलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.

संपर्क - गजेंद्र आढावे ७२६४९२७७८७
(कार्यक्रम सहायक, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)


इतर कृषी शिक्षण
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...
कृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...