रब्बी ज्वारीसाठी करा मुलस्थानी जलसंधारण

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करणे फार महत्त्वाचे असते. कोरडवाहू ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. तसेच शेतामध्ये मुलस्थानी पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याची हीच वेळ आहे.
Inland water conservation for rabi sorghum
Inland water conservation for rabi sorghum

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करणे फार महत्त्वाचे असते. कोरडवाहू ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. तसेच शेतामध्ये मुलस्थानी पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याची हीच वेळ आहे. सध्या पावसाची सुरुवात लवकर झाली असून, त्यामुळे शेतातील मातीची ढेकळे विरघळली असतील. ज्या ठिकाणी ढेकळे विरघळली नसतील तिथे ती ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर ३ ते ४ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करावी. शेवटच्या पाळी पूर्वी प्रति हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत किंवा कंपोष्ट खत जमिनीवर पसरावे. जमिनीत पाणी मुरविण्याकरिता कुळवाच्या पाळ्या व इतर मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. शेतामध्ये मुलस्थानी पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे. रब्बी ज्वारीच्या उत्पादन वाढीमध्ये मुलस्थानी जल व्यवस्थापन हे महत्त्वाचे सूत्र आहे. त्यासाठी जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्यांमध्ये पावसाचे पाणी शेतजमिनीत मुरविण्यासाठी जमिनीची बांधणी करावी. त्यासाठी १० x १० चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावे. अथवा २.७० मीटर अंतरावर सारा यंत्राच्या साहाय्याने सारे पाडून घ्यावेत. त्यानंतर २० मीटर अंतरावर बळीराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत. यामुळे पावसाचे पाणी भरपूर मुरते. या तंत्राचा वापर केल्यास ज्वारी उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे निष्कर्ष आहेत. संपर्क- डॉ. दीपक दुधाडे, ८२७५३९१४६०, ०२४२६-२३३०८० (ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com