आमदार कडू यांच्यासह १८ जणाची निर्दोष सुटका

आमदार कडू यांच्यासह १८ जणाची निर्दोष सुटका
आमदार कडू यांच्यासह १८ जणाची निर्दोष सुटका

अमरावती ः शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी विभागीय आयुक्‍त कार्यालय आणि उपवनसंरक्षक कार्यालयात फटाके फोडण्याच्या आरोपातून आमदार बच्चू कडूंसह १८ जणांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. प्रथम श्रेणी न्यायाधीश क्रमांक चार एस. ए. देशपांडे यांनी हे आदेश दिले. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते.

वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करावी व ती तत्काळ मिळावी, यासह विविध शेतीप्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात अंतर्गत विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्याकरिता बेकायदा जमाव करून दोन वाहनांवर लाऊडस्पीकर लावण्यात आले. त्यासोबतच विभागीय आयुक्‍त कार्यालयात सुतळी बॉँब व फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आल्याचाही आरोप होता.

या प्रकरणी पहिला गुन्हा गाडगेनगर पोलिसांत दाखल करण्यात आला. यामध्ये आमदार कडू यांच्यासह १४ आरोपी होते. दुसरे प्रकरणात आमदार कडू यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपवनसंरक्षक कार्यालयात आदिवासींचे पारंपरिक शस्त्र बेकायदेशीररीत्या हाती घेऊन मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप होता. या दोन्ही प्रकरणांत आमदार बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. आमदार कडू यांच्या वतीने अनिल विश्‍वकर्मा, अनिरुद्ध लढ्ढा या वकिलांनी बाजू मांडली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com