नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांचा विशेष गौरव करणार: कृषिमंत्री भुसे

नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांचा  विशेष गौरव करणार: कृषिमंत्री भुसे
नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांचा विशेष गौरव करणार: कृषिमंत्री भुसे

नगर : कृषी विभाग हा आव्हानात्मक विभाग आहे. सारी आव्हाने पोलून काम करणार आहोत. यापुढे नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांचा महाराष्ट्र शासन विशेष गौरव केला जाईल. कार्यालयापेक्षा बांधावर जाऊन माहिती घेऊन काम करणार आहोत, असे मत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.  महात्मा फुले कृषी विद्यापीठात शनिवारी (ता. ११) मागोवा २०१९, रब्बी तंत्रज्ञान दिवस आणि शेतकरी मेळावा झाला. अध्यक्ष स्थानी कृषिमंत्री दादाजी भूसे होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लहु कानडे, प्रकाश गजभिये, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, महाराष्ट्र कृषी व शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.  मंत्री भुसे म्हणाले, ‘‘शेतीसाठी संशोधन महत्त्वाचे आहे. विद्यापीठाकडून राज्याच्या अपेक्षा आहेत. केलेले संशोधन बांधावर कसे जाईल, यासाठी कृषी विद्यापीठाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यापीठात ज्यांना ज्यात रस आहे त्यात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. आतापर्यंत एसीत बसून योजना आखल्या जायच्या.  आता असे होणार नाही. थेट बांधावर जाऊन माहिती घेऊनच योजना केल्या जातील. नवीन योजना आणू आणि जुन्या बिनकामिच्या योजना बंद करू. शेतकरी आत्महत्या होणार नाहीत यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. शेतकरी केंद्र बिंदू समजूनच काम करण्याचे सरकारचे नियोजन आहे. अनेक आव्हानाला सामोरे जात आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणणार आहोत. शेतकरी आर्थिक सक्षम करण्यासाठी आम्ही नवनवीन संशोधन करण्याचे नियोजन केले आहे.  प्रारंभी विद्यापीठाने वर्षभरात केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. पन्नास वर्षात २६३ वाण विकसित केले असून १५२८ शिफारसी केल्या. ३७ अवजारे विकसित केली. १५०० टेक्नॉलॉजी केल्या असल्याचे सांगण्यात आले. प्रारंभी ज्वारी सुधार प्रकल्पात शिवार फेरी काढण्यात आली तसेच कृषी विद्यापीठाने केलेल्या कामाची माहिती देणारया प्रदर्शनाचे उद्‌घाटन करून मंत्री भुसे, थोरात यांनी पाहणी केली.  दरम्यान, परभणीत बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली तर चौकशी करून कारवाई करणार असल्याचे भुसे यांनी  सांगितले.  कुलसचिवाविरोधात घोषणा महात्मा फुले कृषी विद्यापीठात शनिवारी मागोवा २०१९, रब्बी तंत्रज्ञान दिवस आणि शेतकरी मेळाव्यासाठी आलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री दादाजी भुसे याच्यासमोर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिवाविरोधात घोषणा देत कुलसचीव सोपान कासार यांना पदावरून हटविण्याची मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com