पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २३) सुमारे १४० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे दुर्भिक्ष आणि थंडीचा कडाका यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आवकेत घट झाली आहे. परिणामी, टोमॅटो, सिमला मिरची, पावटा, गवार, भेंडी, कारली, दोडका यांच्या दरात वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे १५ टेंपो हिरवी मिरची, बंगलोर येथून २ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि पंजाब येथून सुमारे २५ ट्रक मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टेमॅटोे सुमारे ३ हजार क्रेट, कोबी ८ तर फ्लॉवर सुमारे १५ टेंपो, भेंडी ५ टेंपो, गवार २ टेंपो, ढोबळी मिरची १० टेंपो, हिरवी मिरची २ टेंपो, पावटा ४ टेंपो आवक झाली होती. तर नवीन कांदा सुमारे ५० आणि आणि जुना कांदा सुमारे ७ ट्रक आवक झाली होती. तसेच आग्रा, इंदूर येथून बटाट्याची ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा : जुना ३०-७०, नवीन ७०-१००, बटाटा : जुना ६०-१००, नवीन -१००-१२०, लसूण : १००-२००, आले : सातारी : बंगलोर - ५००-६००, भेंडी : ३५०-४५०, गवार : गावरान, सुरती ५००-६००, टोमॅटो : १४०-१८०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : १५०-२००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २००-२५०, पडवळ : १४०-१६०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ६०-१००, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : १००-२००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-४५०, गाजर : १००-१४०, वालवर : १५०-२००, बीट : ८०-१२०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ५००-५५०, पावटा : ३००-३५०, मटार : २००- २४०, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : १००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे ७५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : ६००-८००, शेपू : ५००-६००, कांदापात : ६००-८००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ६००-८००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ३००-८००.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. २३) मोसंबी सुमारे ६० टन, संत्री ३ ट्रक, डाळिंब सुमारे २५० टन, पपई २० ते २५ टेंपो, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिकू एक हजार बॉक्स आणि गोणी, पेरू४५० ते ५०० क्रेट, कलिंगड २५ टेंपो, खरबूज ८ ते १० टेंपो, विविध जातींची बोरे सुमारे अडीच हजार गोणी, सीताफळाची तीन ते साडेतीन टन आणि विविध द्राक्षांची सुमारे ९ टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोण) : २००-४५०, मोसंबी : (३ डझन) : १५०-२८०, (४ डझन ) : ८०-१४०, संत्रा : (८ ते १२ डझन) ५००-७००, (१२ ते १५ डझन) : ४००-६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-६०, आरक्ता १५-३५. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : २०-१५०, सिमला (२५ किलो) १३००-२०००, किन्नोर : (२५ किलो) २३००-३०००, काश्‍मीर डेलिशिअस : (१५ किलो) ८००-१३००, बोरे : चेकनट (१० किलो) २८०-३००, उमराण (१० किलो) ७०-८०, चमेली (१० किलो) १३०-१७०, चण्यामण्या ३२०-३७०. द्राक्षे : तास-ए-गणेश (१५ किलो) १२०० ते १३००, जम्बो (१० किलो) ८०० ते १३००.

फुलबाजार दुष्काळी परिस्थितीचा फटका फूल उत्पादनाला बसण्यास सुरवात झाली आहे. परिणामी, उत्पादन घटले असून, लग्न हंगामासाठीच्या विविध फुलांना मागणी वाढली आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांची मागणी टिकून असल्याने विविध फुलांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे.  

फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ८०-१२०, गुलछडी : ८०-१५०, बिजली : ५०-८०, कापरी : ४०-७०, शेवंती ६०-१२०, ॲस्टर : १२-२०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १६-२५, गुलछडी काडी : १२-८०, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, लिली बंडल : ३-१०, जरबेरा : ३०-८०, कार्नेशियन : १००-२००.

मासळी बाजार समुद्रात वादळाची स्थिती निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश, मद्रास, मुंबई, रत्नागिरी, गुजरात आदी भागांतील मासेमारी बंद आहे. परिणामी, मासळीची आवक घटली असून, खोल समुद्रातील मासळीच्या दरात ३० टक्क्यांपर्यत वाढ झाली आहे. तसेच नदीच्या मासळीची मागणी वाढल्याने त्यांच्या दरातदेखील ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ७  टन, खाडीची २०० किलो, नदीची सुमारे ६०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याचे देखील परदेशी यांनी सांगितले. तसेच थंडी वाढल्याने अंड्यांच्या मागणीबरोबर इंग्लिश आणि गावरान अंड्यांच्या दरात शेकड्याला दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर मटण आणि चिकनचे दर तुलनेने स्थिर होते.  

खोल समुद्रातील  मासळी (प्रतिकिलोचे भाव)  पापलेट : कापरी : १५००, मोठे : १४००, मध्यम : १०००-११००, लहान : ८००-९००, भिला : ५५०-६००, हलवा : ६००, सुरमई : ६००, रावस-लहान : ५५०-६००, मोठे ६५०-८००, घोळ : ६००, करली : ३२०, करंदी  (सोललेली) : ३२०,  भिंग ३२०, पाला : लहान ६००, मोठे : १२००-१४००, वाम : लहान ४८० पिवळी मोठे  ६००-७००,  काळी : २८०, ओले बोंबील : लहान १८०, मोठी २००-२८०.

कोळंबी ः लहान : ३६०, मोठी : ४८०-५५०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान  २०० मोठे २८०-३२०, मांदेली : १००-१२०, राणीमासा : २००, खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ४४०-४८०. 

खाडीची मासळी : सौंदाळे : २००-२४०, खापी २००, नगली : लहान ३२० मोठी ५२०, तांबोशी ३६०-४००, पालू : ३२०, लेपा : लहान १००, मोठे २००-२४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान १६० -१८०, मोठा २००-२४०, पेडवी : १००, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : १८०, तारली : १२०. 

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०-२००, मरळ : लहान ३६०, मोठी ४८०, शिवडा : २०० चिलापी : ६०-८०, मागूर : १४०, खवली : २००, आम्ळी : १०० खेकडे : २००, वाम : ६०००. 

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.  चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.  अंडी : गावरान : शेकडा : ७५०, डझन : १०० प्रति नग : ८.५ इंग्लिश : शेकडा : ४८०  डझन : ६६, प्रतिनग : ५.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com