पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दरांमध्ये वाढ

पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दरांमध्ये वाढ
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दरांमध्ये वाढ

पुणे ः पावसाने दिलेल्या माेठ्या खंडामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटल्याने विविध भाजीपाल्यांच्या दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ७) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. या वेळी आले, भेंडी, टाेमॅटाे, काकडी, शेवगा, गाजर, श्रावणी घेवडा, मटार, पावटा यांच्यासह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली हाेती.

भाजीपाल्याच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ५ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे २० टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून १ टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसणाची साडे चार ते पाच हजार गोणी आवक झाली हाेती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० पोती, टॉमेटोे सुमारे ५ हजार क्रेट, फ्लॉवर १० तर काेबी सुमारे १५ टेम्पो, गवार आणि भेंडी प्रत्येकी ८ टेम्पो, ढोबळी मिरची १५ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, मटार २०० तर भुईमूग शेंग १५० गोणी, गाजर २०० गाेणी नवी कांदा सुमारे १० तर जुना कांदा सुमारे ७० ट्रक आणि आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : ८०-१२०, बटाटा : १४०-१८०, लसूण : १००-२००, आले : सातारी : ६५०-७५०, बंगळूर ६००-६५०, भेंडी : २००-२५० गवार : सुरती- ३००-४००, टोमॅटो : ५०-१००, दोडका : १५०-२०० हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १२०-१६०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी १५०-१६०, पांढरी : १००-१२०, पापडी : १४०-१६०, पडवळ : १४०-१५०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ४०-८०, वांगी : १००-२०० डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १००-१५०, तोंडली : कळी १८०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ५००-६००, गाजर : १५०-१८०, वालवर : २५०-३००, बीट : ६०-१००, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २५०-३५०, भुईमूग : ३००-४००, पावटा : २५०-३००, मटार : १२००, तांबडा भोपळा : ४०-८०, सूरण : २३०-२५०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे एक लाख, तर मेथी सुमारे ५० हजार जुड्या आवक झाली हाेती.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) कोथिंबीर : ५००-१४००, मेथी : ५००-१२००, शेपू : ७००-९००, कांदापात : ५००-७०० चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ४००-६००, पालक : ५००-८००.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. ७) मोसंबी सुमारे १०० टन, संत्री ३० टन, डाळिंब ३०० टन, पपई २५ टेम्पोे, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिक्कू ६०० बॉक्स आणि गाेणी, पेरू २०० क्रेट, कलिंगड २० टेम्पो, खरबूज १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे २५० गोणी, तर सीताफळाची सुमारे १० टन आवक झाली हाेती.  येत्या आठवड्यात नवरात्रीला प्रारंभ हाेत असल्याने विविध व्यापाऱ्यांकडून फळांना मागणी वाढल्याने दरात १० ते २० टक्क्यांंनी वाढ झाली आहे. तर लिंबाची आवक घटल्याने गाेणी मागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-७००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२२०, (४ डझन ) : ३५-८०, संत्रा : (३ डझन) १२०-२२०, (४ डझन) : ३५-८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१८०, गणेश १०-४०, आरक्ता २५-६०. कलिंगड : ५-१६, खरबूज : १०-३०, पपई  : ५-२०, चिक्कू : १००-७००, पेरू (२० किलो) : ४००-६००, सीताफळ : २०-२००, सफरचंद  सिमला (२५ किलो) १३००-१८००, किन्नोर : (२५ किलो) २२०-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५ किलो) ८००-१४००, अमेरिकन ११००-१५००, गोल्डन (१५ किलो) ८००-१०००, बोरे : चेकनट (१० किलो) ५५०-६५०, उमराण (१० किलो) ९०-१००, चमेली (१० किलो)  १८०-२२०, चण्यामण्या ५५०-६००.

फुलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-२०, गुलछडी : २०-६०, बिजली : १०-२०, कापरी : ५-२०, शेवंती ३०-८०, ऑस्टर : ३-८, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१०, गुलछडी काडी : ६-४०, डच गुलाब (२० नग) : ३०-४०, लिलिबंडल : ३-५, जर्बेरा : ५-१०, कार्नेशियन : ३०-६०, चमेली : ३००-४००, जुई : ४००-६००.

मटण मासळी मंगळवारची (ता. ९) सर्वपित्री अमावस्या व बुधवारी (ता. १०) हाेणारी घटस्थापना यामुळे नवरात्रीच्या अगाेदराचा शेवटचा रविवार असल्याने विविध मासळीला मागणी वाढली हाेती. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ४०० किलो, नदीची सुमारे ८०० किलाे आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ टन आवक झाल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००, मोठे : १४००, मध्यम : ९००-१००० लहान : ५५०-६००, भिला : ४८०-५००, हलवा : ४००-४४०, सुरमई : ४००-४८०, मोठे ५५०-६००, रावस-लहान : ४८०, मोठे ५२० घोळ : ४००- ४८०, करली : २४०, करंदी -१२०, भिंग : २८०, पाला : ६००-८०० वाम : पिवळी लहान २४० मोठी ४००-४८०, काळी : २००, ओले बोंबील : १००. कोळंबी ः लहान : ३६०, मोठी : ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २४०, मांदेली : १०० राणीमासा : १६० खेकडे : १८०, चिंबोऱ्या : ४००-४८०, खाडीची मासळी : सौंदाळे : २००, खापी : १६०-२००, नगली : लहान २८० - ४८०, तांबोशी : २८०, पालू : २८०, लेपा : लहान १००- २००, शेवटे : २८० बांगडा : लहान १४० मोठा २००, पेडवी : ४०, बेळुंजी : १००, तिसऱ्या :१६० खुबे : १२०, तारली : १०० नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १६०-१८०, मरळ : लहान २४०, मोठी ४००, शिवडा : १६० चिलापी : ५०-६०, मांगूर : ६०, खवली : १६०-२००, आम्ळी :६०- ८० खेकडे : १६०, वाम : ४८०. मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६० कलेजी : ५००. चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.अंडी : गावरान : शेकडा : ६४०, डझन : ९० प्रति नग : ७.५. इंग्लिश : शेकडा : ३७९ डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com