शासकीय धान खरेदीची चौकशी करा : मेंढे

भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. त्याची केंद्रीय समितीकडून चौकशी करावी आणि दोषींना कठोर शिक्षणा व्हावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी लोकसभेत केली आहे.
 Inquire into government grain procurement : Mendhe
Inquire into government grain procurement : Mendhe

भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. त्याची केंद्रीय समितीकडून चौकशी करावी आणि दोषींना कठोर शिक्षणा व्हावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी लोकसभेत केली आहे. 

संसद अधिवेशना दरम्यान शून्य काळामध्ये खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावरील अनागोंदीचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने १८३५ रुपयांच्या हमीभावासोबतच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे लगतच्या काही राज्यांतील धान दराच्या तुलनेत महाराष्ट्रातील धान दर वाढले आहेत. 

ही बाब लक्षात घेता परप्रांतातील धान स्थानिक शेतकऱ्यांच्या नावावर खरेदी करून शासनाची दिशाभूल केली जात आहे. 

या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी झाल्यानंतर काही केंद्र चालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र अपेक्षीत कारवाई अभावी अशा प्रकारचे गैरप्रकार पुन्हा वाढीस लागले. केंद्र व राज्य शासनाद्वारे संस्था नेमून धान खरेदी केली जाते. सामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, असा उद्देश त्यामागे आहे. परंतु सामान्य शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचेच हित या केंद्रांवर सर्वाधिक जपण्यात येते. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मेंढे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com