Agriculture news in Marathi Inquire me about Vaze: Ajit Pawar | Agrowon

वाझेप्रकरणी माझी चौकशी करा ः अजित पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरात आज (ता. ८) वाझेप्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावत, ‘याप्रकरणी माझी चौकशी करावी’ असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.

पंढरपूर, जि. सोलापूर : सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव या प्रकरणी जोडले गेले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरात आज (ता. ८) वाझेप्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावत, ‘याप्रकरणी माझी चौकशी करावी’ असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपुरात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव येथील काळे यांच्या फार्महाउसवर पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वाझेप्रकरणी खुलासा केला.

या वेळी पवार म्हणाले, की वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषण देखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचे काहीच कारण नाही. माझे या प्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही उपमुख्यमंत्री पवार यांनी केला.

महाराष्ट्राला जेवढी लस मिळायला पाहिजे तेवढी लस मिळत नाही. सुरुवातीच्या काळात केंद्राने परदेशात लस पाठवण्याची घाई केली, पण ठीक आहे, ती पण आपलीच भावंडं आहेत. आपल्या देशात तयार होणारी लस आपल्या लोकांना आधी मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बाहेरच्या देशात लस पाठवण्याऐवजी आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच ३५० कोटी लसीचं वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राला ७ लाख ५० हजार लसी मिळाल्या आहेत. ठरावीक दिवसांत लसीकरण संपवायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. या वेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, भगीरथ भालके आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...