agriculture news in Marathi inquiry of committee report break incident Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कारवाई दूरच; आता अहवाल फुटल्याची चौकशी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भरतीमधील प्रमाणपत्रे खोटी असल्याचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यावर फौजदारी कारवाई करणे दूरच.

पुणे : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भरतीमधील प्रमाणपत्रे खोटी असल्याचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यावर फौजदारी कारवाई करणे दूरच; पण हा अहवाल फुटला कसा याचीच चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. 

मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख पदासाठी आठ वरिष्ठ शास्त्रज्ञांना डावलून भरती केली आहे. तशा तक्रारी राज्यपालांपर्यंत गेल्यानंतर कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमली. विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने या भरतीमधील दस्तऐवज बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. 

‘‘मानकर समितीचा अहवाल धक्कादायक व स्पष्ट आहे. कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी कुलसचिवांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी चौकशी करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या समितीचा अहवाल कसा फुटला, यात कोण गुंतले आहेत याची बारकाईने चौकशी स्वतः कुलसचिव करीत आहेत. यामुळे मूळ गुन्हा उघड करण्याऐवजी तो दडपण्याचा हेतू दिसून येतो आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मानकर समितीचा अहवाल कृषी परिषदेसह राज्यपालांकडे देखील पाठविण्यात आला आहे. परिषदेच्या अखत्यारित काम करणाऱ्या कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळामार्फत ही संशयास्पद भरती झाली होती. मंडळाचे सदस्य सचिव तथा परिषदेचे महासंचालक विश्‍वजित माने यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. ‘‘महासंचालकांनी या प्रकरणी विद्यापीठाकडे अहवाल मागितला होता. तथापि, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी चौकशी सुरू असल्याचे कारण देत परिषदेला देखील माहिती दिलेली नाही,’’ असे परिषदेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

पाटील समितीचे काय झाले? 
विद्यापीठातील संशयास्पद भरतीबाबत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या दडपलेल्या अहवालाची आता चर्चा सुरू झाली आहे. पाटील समितीने चौकशीला दिरंगाई का केली, मुळात अहवाल सादर केला की नाही, केला असल्यास कोणाकडे दिला, कृषी परिषदेला मानकर समितीचा अहवाल पाठविला जातो. मात्र पाटील समितीचा अहवाल का झाकून ठेवला जातो, असे विविध प्रश्‍न आता विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उपस्थित केले आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...