agriculture news in Marathi inquiry of irrigation fraud on fast track Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी युद्धपातळीवर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदान लाभप्रकरणी चौकशी युद्धपातळीवर सुरू आहे. जालना पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यातही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदान लाभप्रकरणी चौकशी युद्धपातळीवर सुरू आहे. जालना पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यातही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच बीड जिल्ह्यातही चौकशी केली जाईल, असे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी सांगितले. याप्रकणी जालना जिल्ह्यातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे डॉ. जाधव म्हणाले.

जालना जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन अनुदान लाभाविषयीच्या तक्रारीची कृषिमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली होती. स्वतः शुक्रवारी (ता २०) जालना येथील जिल्हा कृषी अधीक्षक यांचे कार्यालय गाठत संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. त्यांनी केलेल्या शहानिशेत बनावट सातबारा तयार करणे, एकाच लाभार्थ्याला दोन योजनेचा लाभ देणे, निकृष्ट साहित्य पुरविणे आदी गंभीर बाबी समोर आल्याचे श्री. भुसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कृषी विभागाचे सचिव व आयुक्त यांच्याशी संपर्क करून याप्रकरणी तातडीने दखल घेण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी दिले होते. 

‘‘यापैकी काही प्रकरणांत प्राथमिक चौकशी झाली, नोटिसाही काढल्या गेल्या. नव्याने समोर आलेल्या आणखी काही प्रकरणांची सचिव आणि आयुक्त चौकशी समिती नेमून ठरावीक काळामध्ये चौकशी पूर्ण करतील. अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’’ असेही श्री भुसे यांनी स्पष्ट केले होते.

सद्यःस्थितीत जालना जिल्ह्यात ५ कंपन्यांच्या ८ डीलरमार्फत १२३३ प्रस्तावांची ६ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात येत आहे. जसजशी चौकशीत माहिती मिळेल, तशी पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जालना कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

जालन्यात एक अधिकारी निलंबित
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळांतर्गत कार्यरत कृषी पर्यवेक्षक दिलीप तराळ यांच्यावर २३ नोव्हेंबरला निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या सूचनांची अवहेलना व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जालना पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यातही पथकामार्फत सूक्ष्म सिंचनात काही गैरप्रकार झाला का, याची चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. जाधव म्हणाले. त्यामुळे आता चौकशी सत्रातून काय पुढे येते व कुणा कुणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...