`राहुरी`च्या कुलसचिवांची होणार चौकशी

‘माझे काम चांगले आहे. मी प्रामाणिक आहे. कोणत्याही चौकशीबाबत पत्र मला आलेले नाही. माझी बदनामी चालू असून, याबाबत विद्यापीठाकडून शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे.’ - सोपान रामनाथ कासार, कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
`राहुरी`च्या कुलसचिवांची होणार चौकशी
`राहुरी`च्या कुलसचिवांची होणार चौकशी

पुणे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या संशयास्पद नियुक्तीची चौकशी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  “महसूल विभागातील वादग्रस्त उच्च पदस्थ अधिकारी सोपान रामनाथ कासार यांच्या नियुक्तीची चौकशी करण्याचे आदेश (१४१९-प्र.क्र.१४३) मंत्रालयातून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक या प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल राज्य शासनाला पाठवतील,” अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली. नाशिकच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारीपदी कार्यरत असलेल्या कासार यांच्यावर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एकदा नव्हे तर दोनदा लाचखोरीची कारवाई केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना विद्यापीठाचा कुलसचिव म्हणून नियुक्त केले जात नाही. शासन स्वतः गेल्या काही वर्षांपासून ही दक्षता घेत आहे. कासार यांच्या लाचखोरीतील एका प्रकरणाचा तपास सुरू असतानाही भाजप सरकारच्या काळात थेट मुख्यमंत्री कार्यालयातून कुलसचिवपदाची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कासार यांनी कुलसचिवपदाची सूत्रे घेताच बदल्यांचा धडाका लावला. या बदल्यांमध्येदेखील आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी  झाल्या. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यांच्याकडून आता कासार प्रकरणाचे धागेदोरे तपासले जातील. “कुलसचिव कासार यांची नियुक्ती नियमबाह्य झाल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त होत आहेत. त्यांचा मनमानी कारभार, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत निवेदने प्राप्त झालेली आहेत,” असे मंत्रालयातून महासंचालकांना सांगण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत तक्रारी व निवेदने प्राप्त झालेली आहेत. विद्यापीठांतर्गत करण्यात आलेल्या काही बदल्यादेखील उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्या आहेत. त्यामुळे कासार यांच्या संदर्भातील प्राप्त सर्व तक्रारींचा सविस्तर सत्यतादर्शक अहवाल त्वरीत पाठवा, अशा सूचना महासंचालकांना देण्यात आलेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com