सारथीच्या कारभाराची लवकरच चौकशी

SARTHI
SARTHI

मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेत (सारथी) अनियमितता झाल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यावर या संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून त्यासाठी लवकरच समिती नेमण्यात येणार असल्याचे कळते. मराठा आणि कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी ही संस्‍था स्‍थापन करण्यात आली. या संस्‍थेची जबाबदारी सचिव जे. पी. गुप्ता यांच्याकडे गेल्‍यानंतर संस्‍थेत अनियमितता असल्‍याचे सांगत अनेक निर्णय त्‍यांनी रद्द केले होते. राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथे या प्रश्नावरून उपोषणही केले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्‍थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेउन जे. पी. गुप्ता यांना या पदावरून हटविण्याची घोषणाही केली होती. त्‍यानंतर सारथीच्या सचिवपदाचा कार्यभार मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला. निंबाळकर यांना मंत्रिमंडळ बैठकीत सारथीच्या कामाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी संस्थेच्या कामात अनियमितता आणि गोंधळ असल्याची माहिती मंत्रिमंडळाला दिल्‍याचे समजते. कर्मचारी भरतीतही अनियमितता  संस्थेने केलेली वाहन खरेदी, पुस्तक खरेदीला तसेच कर्मचारी भरतीत अनियमितता आहे. या निर्णयांना राज्य सरकारची मान्यताही घेण्यात आलेली नाही. योजनेसाठी दिलेला पैसा प्रशासकीय कामांना वळविण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याचे निंबाळकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले. त्यावर बैठकीत या संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्यावर चर्चा झाली. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यासंदर्भातील आदेश निघण्याची शक्यता आहे. तसेच, चौकशी होईपर्यंत संस्थेचे संचालक डी. आर. परीहार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारायचा की नाही, यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com