agriculture news in Marathi inquiry will be done of professor selection Maharashtra | Agrowon

प्राध्यापक नियुक्तीची चौकशी होणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील एका प्राध्यापक नियुक्ती प्रकरणाच्या प्रक्रियेची चौकशी होणार आहे.

पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील एका प्राध्यापक नियुक्ती प्रकरणाच्या प्रक्रियेची चौकशी होणार आहे. 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून देखील याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी परिषदेने अर्ज मागवले होते. त्यात दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. प्रकाश शिनगारे यांची प्राध्यापकपदी झालेली नियुक्ती केली गेली. याच नियुक्तीबाबत चौकशी केली जाणार आहे. 

राज्यपाल कार्यालयाने याबाबत एक तक्रार कुलगुरूंकडे वर्ग केली आहे. ‘मत्सविद्याशाखेचे संशोधन अधिकारी प्रा. डॉ. शिनगारे यांच्याविरुद्ध रत्नागिरीमधील मत्य विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी तक्रार केली आहे. मात्र हा विषय आपल्या कक्षेत येतो. त्यामुळे कार्यवाहीसाठी पाठवला आहे,” असे राज्यपाल कार्यालयाने म्हटले आहे. 

दरम्यान, ‘‘विद्यापीठात नियुक्तीसाठी डॉ. इंदुलकर यांच्याकडे पात्रता आहे. मात्र डॉ. शिनगारे हे अपात्र असतानाही त्यांची निवड केली असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून डॉ. इंदुलकर यांना न्याय द्यावा,’’ असे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कृषिमंत्र्यांच्या पत्रात म्हटले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...