Agriculture news in Marathi Insect attack on crops due to cloudy weather | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा हल्लाबोल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे तूर, रब्बीतील हरभरा, तसेच संत्रा, मोसंबी आदी फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे.

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे तूर, रब्बीतील हरभरा, तसेच संत्रा, मोसंबी आदी फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. किडींच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे कीड नियंत्रणावरील खर्च वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून या दोन जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. तापमानात चढ-उतार होत आहेत. कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तूर पीक फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. फुलगळ सुरू आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. त्यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. संत्रा, मोसंबी आदी फळपिकांवर रसशोषण करणाऱ्या काळ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे अनेक भागांत कीड आर्थिक नुकसान पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. विविध भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ढगाळ वातारवरणामुळे तुरीत फुळगळ होत आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. फळपिकांवर मोसंबी, संत्र्यावर काळ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
- डॉ. डी. डी. पटाईत, कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर पाने खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. अळी नियंत्रणात येत नसल्याने नुकसानीची व्याप्ती वाढली आहे.
- प्रताप काळे, धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...