Agriculture news in marathi Insect infestation on trumpets due to cloudy weather | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडींचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

 मागील दोन-तीन दिवसांपासून शिरपूर व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तुरीवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. धुके पडत असल्याने तुरीचे फूल करपून गळत आहे. त्यामुळे तुरीच्या पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिरपूर जैन (जिल्हा वाशीम) : मागील दोन-तीन दिवसांपासून शिरपूर व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तुरीवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. धुके पडत असल्याने तुरीचे फूल करपून गळत आहे. त्यामुळे तुरीच्या पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिरपूर व परिसरात दोन तीन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण झाले. दरम्यान, परिसरात काही प्रमाणात पाऊस ही पडला आहे. त्यातच सकाळी धुके पडत असल्याने तुरीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. तुरीबरोबरच हळद व फळबाग पिकावर ही किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वातावरणाचा फटका पिकांना बसला तर निश्चितच एकूणच पिकांचे उत्पन्न घटणार आहे.

आधीच खरिपातील सोयाबीन पिकाचे अति पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना फटका देणारे ठरले. त्यात  तूर, हळद, फळबाग या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागेल. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढली आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खिशाला अजून कात्री लागण्याची चिन्हे दिसत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...