सोयाबीन पिकाची किडीकडून चाळण

तालुक्यातील लोणी येथील साडेपाच एकरांतील सोयाबीन पीक वाणीने चाळणी चाळणी करून फस्त केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली असून, कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी केली आहे.
Insect sifting of soybean crop
Insect sifting of soybean crop

आर्णी, जि. यवतमाळ : तालुक्यातील लोणी येथील साडेपाच एकरांतील सोयाबीन पीक वाणीने चाळणी चाळणी करून फस्त केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली असून, कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी केली आहे. 

या वर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासूनच वाणी किडींचा प्रकोप वाढला होता. अशातच आर्णी तालुक्यातील लोणी येथील शेतकरी सुरेश काळे यांच्या साडेतीन एकरातील व नरेंद्र लाड यांच्या दोन एकरांतील सोयाबीन पिकांची चाळणी करून पूर्णपणे फस्त केले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सदर नुकसानग्रस्त सोयाबीन शेताची प्रभारी तालुका कृषी अधिकारी अरविंद राठोड, कृषी सहायक विजय गडपायले तसेच आत्माचे भोयर यांनी पाहणी केली.

लोणी शिवारात कपाशी, सोयाबीनच्या पिकाची कोवळी पाने वाणी किडींनी फस्त केल्याने या पिकाची वाढ पूर्णपणे थांबली आहे. आता सुरेश काळे आणि नरेंद्र लाड यांच्या सोयाबीनच्या शेतात मात्र वाणी किडींचा प्रकोप अधिक प्रमाणात दिसून आला. सोयाबीन फुलोरा अवस्थेत असतानाही या वाणी किडींचा प्रादुर्भाव थांबला नाही म्हणून त्यांनी झालेली नुकसानभरपाई मिळावी यासाठी पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली असल्याचे सांगितले. सोयाबीन पीक पूर्णपणे फस्त केल्याने उत्पादन होणार नाही कारण ऐन पीक वाढीच्या काळात वाणी किडींनी पाने खाल्ली आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी सुरेश काळे व नरेंद्र लाड या दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com