औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी

औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे राबविलेल्या आठवडाभराच्या अभियानात १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली.’’अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी दिली.
 Inspection of 151 Fertilizer Agriculture Service Centers a week in Aurangabad district
Inspection of 151 Fertilizer Agriculture Service Centers a week in Aurangabad district

औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे राबविलेल्या आठवडाभराच्या अभियानात १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी दिली. हंगाम संपेपर्यंत हे अभियान सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभाग व जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे २६ जून ते एक जुलै दरम्यान ७ दिवसांचे विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रत्येक तालुक्यातील कृषी निरीक्षकांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. त्यात आढळलेल्या चतुर्थीच्या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून संबंधितांवर कायदेशीर कारवाया केल्या. 

या अभियानांतर्गत औरंगाबाद तालुक्यातील १२, वैजापूर २३, खुलताबाद १८, सिल्लोड १०, फुलंब्री ११, कन्नड ४, पैठण ५२, गंगापूर २४ अशा एकूण १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. खरीप हंगाम २०२० मध्ये युरिया खताची उपलब्धता व रास्त दराने विक्री, यावर या अभियानात विशेष भर देण्यात आला. युरिया खताच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध व्हावा म्हणून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये युरिया खताची विक्री करण्यात येत आहे. 

तालुकानिहाय पुरवठा करण्यात येणाऱ्या केंद्रांची माहिती क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. मागील हंगामापासून पॉस मशीनचा वापर न केलेल्या खत विक्रेत्यांची यादी उपलब्ध केली. कारवाई करण्याचे प्रगतिपथावर असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. युरियाची चढ्या दराने विक्री होत होती. संबंधित विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील १३, वैजापूर ८, खुलताबाद १,  सिल्लोड ४, फुलंब्री ५, तर पैठणमध्ये २ परवाने निलंबित करण्यात आले. युरियाची विनापरवाना विक्री करणाऱ्या पैठण तालुक्यातील २, औरंगाबाद व वैजापूर तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. 

१७ केंद्रांना विक्री बंदचे आदेश

साठा रजिस्टर न ठेवणे, दर्शनी भाव फलक लावणे, दैनंदिन अहवाल अद्ययावत ठेवणे, आदी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केलेल्या बाबींच्या अनुषंगाने औरंगाबाद तालुक्यात १, गंगापूर ४, फुलंब्री ५, पैठण तालुक्यात ७ अशा १७ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले. 

बियाणे उगवणीच्या २९ तक्रारींचे निवारण

 विविध भागातून बियाणे उगवण संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यातील ८, खुलताबाद ५, सिल्लोड ९, सोयगाव १, कन्नड ६ तर गंगापूर मध्ये १ अशा २९ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे श्री गायकवाड यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com