Agriculture news in marathi Inspection of 151 Fertilizer Agriculture Service Centers a week in Aurangabad district | Page 2 ||| Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे राबविलेल्या आठवडाभराच्या अभियानात १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली.’’अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी दिली.

औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे राबविलेल्या आठवडाभराच्या अभियानात १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी दिली. हंगाम संपेपर्यंत हे अभियान सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभाग व जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे २६ जून ते एक जुलै दरम्यान ७ दिवसांचे विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रत्येक तालुक्यातील कृषी निरीक्षकांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. त्यात आढळलेल्या चतुर्थीच्या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून संबंधितांवर कायदेशीर कारवाया केल्या. 

या अभियानांतर्गत औरंगाबाद तालुक्यातील १२, वैजापूर २३, खुलताबाद १८, सिल्लोड १०, फुलंब्री ११, कन्नड ४, पैठण ५२, गंगापूर २४ अशा एकूण १५१ खत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. खरीप हंगाम २०२० मध्ये युरिया खताची उपलब्धता व रास्त दराने विक्री, यावर या अभियानात विशेष भर देण्यात आला. युरिया खताच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध व्हावा म्हणून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये युरिया खताची विक्री करण्यात येत आहे. 

तालुकानिहाय पुरवठा करण्यात येणाऱ्या केंद्रांची माहिती क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. मागील हंगामापासून पॉस मशीनचा वापर न केलेल्या खत विक्रेत्यांची यादी उपलब्ध केली. कारवाई करण्याचे प्रगतिपथावर असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
युरियाची चढ्या दराने विक्री होत होती. संबंधित विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील १३, वैजापूर ८, खुलताबाद १,  सिल्लोड ४, फुलंब्री ५, तर पैठणमध्ये २ परवाने निलंबित करण्यात आले. युरियाची विनापरवाना विक्री करणाऱ्या पैठण तालुक्यातील २, औरंगाबाद व वैजापूर तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. 

१७ केंद्रांना विक्री बंदचे आदेश

साठा रजिस्टर न ठेवणे, दर्शनी भाव फलक लावणे, दैनंदिन अहवाल अद्ययावत ठेवणे, आदी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केलेल्या बाबींच्या अनुषंगाने औरंगाबाद तालुक्यात १, गंगापूर ४, फुलंब्री ५, पैठण तालुक्यात ७ अशा १७ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले. 

बियाणे उगवणीच्या २९ तक्रारींचे निवारण

 विविध भागातून बियाणे उगवण संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यातील ८, खुलताबाद ५, सिल्लोड ९, सोयगाव १, कन्नड ६ तर गंगापूर मध्ये १ अशा २९ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे श्री गायकवाड यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...
पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...
नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...
रत्नागिरीत पावसाची उसंत; पूर ओसरू लागलारत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वारे वाहत असून...
महापुराच्या आठवणीने नदीकाठ भयभीतकोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून नद्यांच्या...
जळगाव जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये...जळगाव : जिल्ह्यात जळगाव, यावल, रावेर व बोदवड...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला...
नगर जिल्ह्यात दोन वर्षांपासून ज्वारी...नगर ः पंतप्रधान पीक विमा योजनेतून नगर जिल्ह्यातील...