वर्धा जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी

वर्धा जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी
वर्धा जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी

वर्धा ः जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली. पडेगाव येथील प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन क्षेत्राला भेट देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्‍वासन त्यांनी दिले.  जिल्ह्यात पावसामुळे काही भागांत नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त भागाला भेट देत त्यांनी पाहणी केली. त्यासोबतच जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत कमलनयन बजाज फाउंडेशनच्या वतीने नदी, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आले व त्याचा शेतकऱ्यांना कितपत लाभ होत आहे, याची पाहणी करून शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शेतीला पूरक जोडधंदा निर्माण केल्याशिवाय शेती परवडणार नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजयकुमार राऊत, बजाज फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक राजू पवार, तालुका कृषी अधिकारी पी. ए. घायतिडक,  सरपंच अनंता हटवार, कृषी एस. एस. ढुमणे, तलाठी तळवेकर, उपसरपंच गोपाल दुधाने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com