मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
डाळिंबावरील तेलकट डाग, मर, बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी असे करा उपाय
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने डाळिंबावरील रोगांच्या प्रादुर्भावाची पाहणी केल्यानंतर कृषी विद्यापीठाला सविस्तर अहवाल सादर केला.
नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने डाळिंबावरील रोगांच्या प्रादुर्भावाची पाहणी केल्यानंतर कृषी विद्यापीठाला सविस्तर अहवाल सादर केला. अहवालात डाळिंबावरील तेलकट डाग, मर, बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ व सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने उपाययोजना सुचविल्या आहेत.
राज्यासह नगरमधील अनेक भागांत डाळिंबावर जीवाणूजन्य (तेलकट डाग) रोग व बुरशीजन्य ठिपक्याच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंबाचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने उपाययोजना सुचविल्या आहेत.
बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग व विविध
किडींच्या प्रादुर्भावाची कारणे पुढीलप्रमाणे
रोगास पोषक हवामान, उशिरा बहार धरणे, लागवडीमधील कमी अंतर, घनदाट शाखीय वाढ व त्यामुळे बागेमध्ये तयार झालेले रोगास पोषक हवामान, अनावश्यक रसायनांच्या (बुरशीनाशकांच्या/सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या) वारंवार फवारण्या तसेच साठलेल्या पाण्याचा निचरा न होणे, तण व्यवस्थापनाचा अभाव, बागेमधील अस्वच्छता (रोगट पाने व फळे बागेच्या आवारात विखरुन पडलेल्या अवस्थेमध्ये), एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव. सदर भेटी दरम्यान काही शेतकऱ्यांनी काटेकोर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन केल्यामुळे त्या बागेमध्ये रोगांचे व किडींचे प्रमाण कमी प्रमाणात आढळून आले.
शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार या उपाययोजना कराव्यात
- जीवाणूजन्य तेलकट डाग रोग व बुरशीजन्य ठिपक्याच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसीन किंवा २-ब्रोमो २-नायट्रो प्रोपेन १,३ डायोल (ब्रोमोपॉल) (०.५ ग्रॅ.) + कॉपर हायड्रॉक्साईड (७७ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लि. किंवा कॅप्टन ( ५० डब्ल्यूपी) २ ग्रँ./लि.) + स्टीकर (०.५ मिली/ली.) यांची एकत्रित फवारणी करावी.
- जीवाणूजन्य (तेलकट डाग) रोगाची तीव्रता जास्त असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यू पी) किंवा कॉपर हायड्रॉक्साईड ( ७७ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅ.प्रति ली.) + ब्रोमोपॉल (०.५ ग्रँ./ली.) + स्ट्रेप्टोमायसीन (०.५ ग्रँ./ली.) यांची एकत्रित फवारणी पाच दिवसांच्या अंतराने करावी.
- पानावरील बुरशीजन्य ठिपक्याच्या नियंत्रणासाठी प्रोपीनब ३ ग्रॅ. प्रतिलीटर पाणी व त्यापाठोपाठ ७ दिवसांच्या अंतराने अझॉक्सीस्ट्रॉबीन एक मिली/ली. पाण्यात ०.५ मिली स्टीकर मिसळून फवारणी करावी.
- फळकूज, स्कॅब, अल्टरनेरीया नियंत्रणासाठी डायफेनोकोनॅझोल १ मिली/ली. किंवा किटाझीन १ मिली/ली. पाण्यात स्टीकर मिसळून फवारणी करावी.
- मर रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस (२० इसी) ३ मिली प्रतिलीटर अधिक + कार्बेन्डॅझीम (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅ./ली. + कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम./ली. या रसायनांची १० लीटर द्रावणाची भिजवण करून प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या व निरोगी झाडाभोवती करावी.
- मर रोगाच्या नियंत्रणासाठी चार किलो लाल माती किंवा गेरु + क्लोरपायरिफॉस (२० इसी) ५० मि.ली + कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅ. + १० लीटर पाणी यांच्या मिश्रणाची पेस्ट बनवून खोडाला जमिनीपासून २ ते ३ फुट वर पर्यंत लावावी.
- सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ५ किलो शेणखताबरोबर २० ग्रॅ. फुले ट्रायकोडर्मा प्लस व (ट्रायकोडर्मा + पॅसीलोमायसीस) ३ किलो निंबोळी पेंड झाडाभोवती रिंग पद्धतीने मातीत मिसळावे.
- रस शोषणाऱ्या किडी व फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी अझाडिरेक्टीन २० मिली किंवा गरजेनूसार सायॲट्रानीलाप्रोल ९ मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
- रस शोषणाऱ्या किडी व फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी अझाडिरेक्टीन २० मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
- 1 of 1029
- ››