ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त दहा गावांची तपासणी

नगरमधील ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त दहा गावांची तपासणी
नगरमधील ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त दहा गावांची तपासणी

नगर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या आणि जिल्हा पातळीवर बक्षीस मिळवलेल्या नाशिक विभागातील दहा गावांची तपासणी करण्यात आली. त्यात नगरमधील वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) व लोणी (ता. राहाता) या गावांचा समावेश आहे. दहा गावांतून तीन गावांना विभागीय पातळीवरील बक्षिसे जाहीर होणार आहेत. 

राज्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त झाली असली तरी गावातील स्वच्छता मोहीम कायम राहावी यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान शासनाने सुरू ठेवले आहे. मागील अभियानापेक्षा त्यात बरेच बदल केले आहेत. गतवर्षी अभियानात सहभागी झालेल्या गावांची तपासणी केली. 

तपासणी पथकात नाशिक विभागीय कार्यालयातील उपायुक्त (पुनर्वसन) डाॅ. डी. के. खिलारी,  उपायुक्त (विकास) राजेश देशमुख, माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी किरण मोघे, सहायक अधीक्षक अभियंता पी. जी. बिराजदार, श्री. दिनेश मोहाळे विभागीय समन्वयक यांच्या समितीने तपासणी केली आहे. 

आता विभागीय पातळीवर या दहा गावांतून तीन गावांना बक्षीस जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सचिन थोरात, प्रशांत जगताप, मनोज सकट, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, सरपंच स्वाती नऱ्हे, लोणीत जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्यासह कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

या गावांची केली तपासणी जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय आलेल्या गावांची विभागीय स्पर्धेसाठी तपासणी करण्यात  आली आहे. त्यात वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) व लोणी (ता. राहाता) यासह वाटवी (ता. नवापूर) व राजविहीर (ता. तळोदा, जि. नंदुरबार), अजंदे (ता. शिरपूर), परसमाळ (ता.  शिंदखेडा, जि. धुळे), सुसरी (ता. भुतावळ) व मेहेरगाव (ता. अमळनेर, जि. जळगाव).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com