सांगली जिल्ह्यात नुकसानीचे ५४ हजार हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण

सांगली जिल्ह्यात नुकसानीचे ५४ हजार हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण
सांगली जिल्ह्यात नुकसानीचे ५४ हजार हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण

सांगली : ‘‘जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे सुरू आहेत. १० तालुक्यांतील ५७३ बाधित गावातील १ लाख २५ हजार शेतकऱ्यांच्या ३ लाख ७७ हजार हेक्‍टर पेरणी क्षेत्रापैकी ६५ हजार २६७ हेक्‍टर बाधित झाले आहे. ९५ हजार ८८१ शेतकऱ्यांचे ५४ हजार ५९.७१ हेक्‍टरवरील पिकाच्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले,’’ अशी माहती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. ११ हजार २०७.२९ हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तेही पंचनामे गतीने पूर्ण केले जातील. तासगाव तालुक्यातील ६९ गावांतील ६८ हजार २०९ शेतकऱ्यांचे ३४ हजार १०४ हेक्‍टर बाधित आहे. यापैकी ४७ हजार ३८० शेतकऱ्यांचे २५ हजार ९७ हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले.

आटपाडीतील ३७ गावांतील ४०२५ शेतकऱ्यांचे २४२९.६० हेक्‍टर क्षेत्राचे, पलूसमधील ३६ गावांतील २०२३ शेतकऱ्यांचे १११२.२४ हेक्‍टर क्षेत्राचे, खानापूरातील ६६ गावांतील १० हजार ९४६ शेतकऱ्यांचे ५६५५.६४ हेक्‍टर क्षेत्राचे, कडेगावमधील ५६ गावांतील ५४९५ शेतकऱ्यांचे २०१२ हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

वाळवा तालुक्यातील ४४ गावांतील ३०१० शेतकऱ्यांचे १३९४ हेक्‍टरचे, कवठेमहांकाळमधील ६० गावांतील १३ हजार ३०४ शेतकऱ्यांचे ८३८९ हेक्‍टर क्षेत्राचे, जतमधील ७२ गावांतील २९१५ शेतकऱ्यांचे ३४५६.९० हेक्‍टर क्षेत्राचे, शिराळ्यातील ६१ गावांतील ६२३ शेतकऱ्यांचे ९२ हेक्‍टरचे, तर मिरजेतील ७२ गावांतील ६१६० शेतकऱ्यांचे ४४२० हेक्‍टरचे पंचनामे झाले आहेत, अशी माहिती मास्तोळी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com