agriculture news in Marathi, inspections of crop, Maharashtra | Agrowon

नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता.१६) मध्यरात्रीदेखील पुर्वमोसमी वादळी पावसासह गारपीटही अनेक भागात झाली. साक्री, शिरपूर (जि.धुळे) भागात शेडनेट, पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले. नुकसान सतत तीन दिवस झाले; परंतु कमी मनुष्यबळ व लोकसभा निवडणुकांची धामधूम यामुळे पंचनामेच सुरू झालेले नसल्याची माहिती आहे. 

जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता.१६) मध्यरात्रीदेखील पुर्वमोसमी वादळी पावसासह गारपीटही अनेक भागात झाली. साक्री, शिरपूर (जि.धुळे) भागात शेडनेट, पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले. नुकसान सतत तीन दिवस झाले; परंतु कमी मनुष्यबळ व लोकसभा निवडणुकांची धामधूम यामुळे पंचनामेच सुरू झालेले नसल्याची माहिती आहे. 

 जिल्हा प्रशासन मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. कृषी, महसूल विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. कर्मचारी जागेवर नसतात. तलाठी शेतकऱ्यांना मागील १७-१८ दिवसांपासून कार्यालयात भेटलेले नाहीत. यामुळे पंचनामेही ठप्प आहेत.  मंगळवारी सायंकाळी हिंगोणी (ता. शिरपूर) येथे एका घराला वीज स्पर्शून गेल्याने किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, प्रल्हाद बाजीराव कोकणी (जुनी सांगवी, ता. शिरपूर) यांच्या शेतातील खळ्यात वीज कोसळून दोन बैल मृत्युमुखी पडले.

साक्री तालुक्‍यातील खुडाणे व डोमकानीत गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने कांदा पिकासह चाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हतबल व हवालदिल झाला आहे. कांदा व गुरांसाठी राखून ठेवलेला चारा यांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी पराग माळी यांनी दिली. पिंपळनेर भागातही पाऊस झाला. बेहेड ता. साक्री येथे एका शेडनेटचे वादळासह गारपीटीमुळे नुकसान झाले. सामोडे व धमनार (ता. साक्री) येथेही वीज पडून पाच पशुधन मृत्युमुखी पडले.  

जळगाव जिल्ह्यात एरंडोल, धरणगाव, चोपडा, यावल भागातही मंगळवारी रात्री पावसाचा हलका शिडकावा झाला. सुसाट वाराही सुटला होता. सुमारे दोन ते तीन मिनिटे पाऊस काही भागांत झाला. नंदुरबार तालुक्‍यातील शनिमांडळ, न्याहली भागातही जोरदार पावसासह गारपीट झाली. डाळिंब बागा, शेडनेटला फटका बसला आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...