सांगलीत ९९ हजार हेक्टरवर पिकांचे पंचनामे

सांगलीत ९९ हजार हेक्टरवर पिकांचे पंचनामे
सांगलीत ९९ हजार हेक्टरवर पिकांचे पंचनामे

सांगली : ऑक्टोबरमधील पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, बाधित झालेल्या ९९ हजार ६२० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. बाधित क्षेत्रात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाने पंचनाम्याची माहिती मागितल्याने हा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामातील ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवर पेरा झाला होता. ऑक्टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या आदेशानुसार बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात आले.

जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील नुकसानग्रस्त शेतीचा अहवाल तयार झाला आहे. परंतु, बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अहवाल अंतिम नसून तो लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.

तालुकानिहाय पंचनाम्याचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका  बाधित गावांची संख्या पेरणी क्षेत्र पंचनामे झालेले क्षेत्र
तासगाव ६९  ४३ हजार २७७  ३४ हजार ८२३
आटपाडी  ३७ ९ हजार ३१५ ८ हजार ६५२
पलूस ३६ १९ हजार ९८८  ३ हजार २५५
खानापूर ६६  ३६ हजार ६८९ १८ हजार २१६
कडेगाव ५६  ३८ हजार ४५५   ३ हजार ४२६
वाळवा ४४ ६६ हजार ७६८ ३ हजार १३८
कवठेमहांकाळ ६० २४ हजार १५७  १० हजार ९९०
जत १२६  ६५ हजार ८१५ ९ हजार ९९०
शिराळा ६१ ३२ हजार ९९ ९६
मिरज ७२ ४० हजार ५५६ ७ हजार ०३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com